Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या खरेदीदारांना मोठा दिलासा देणारी एक बातमी सराफा बाजारातून समोर आली आहे. मौल्यवान सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण आली आहे. डिसेंबर महिन्यात किंमतींनी उच्चांक गाठला होता.परंतु आता सोने-चांदीचा भावात पुन्हा घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे (Gold Silver Price Today 18 January 2024) नवीन वर्षात 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव उतरला. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. तर या आठवड्यात 15 जानेवारीला सोन्याच्या किंमती 150 रुपयांनीवाढल्या. 16 जानेवारीला 100 रुपयांनी भाव उतरले. तर 17 जानेवारी रोजी 350 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 10 जानेवारीला चांदी 600 रुपयांनी महागली. 11-12 जानेवारी रोजी भाव स्थिर होते. 13 जानेवारीला 500 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्यात 15 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली. तर 16 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे. (Gold Silver Rate Today )
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,277 रुपये, 23 कॅरेट 62,028 रुपये, 22 कॅरेट सोने 57,046 रुपये झाले. 18 कॅरेट 46,708 रुपये, 14 कॅरेट सोने 36,432 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,191 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today : मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.