Education Minister apologizes : काही ठिकाणी वेबसाईट सुरू : वेबसाईट हँग प्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी ! 

दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग विध्यार्थ्यांना नाहक त्रास

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटल आहे कि, ‘आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल; जेणेकरून घडल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये.’ (Education Minister apologizes for website hang case! )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आलेल्या वेबसाईटच्या संकेतस्थळावर गेल्यास काही ठिकाणी ती सुरु होत आहे तर काही ठिकाणी ती बंद पडत आहे. दहावीतील विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी वेबसाईट वर लॉगिन केले जात असल्यामुळे ती साईटच हँग झाली आहे. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्य यांच्यात गेल्या अनेक तासांपासून बैठक सुरु आहे. त्यांच्याकडून वेबसाइटमधील बिघाड काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी वेबसाईट सुरु झाली आहे. तर काही ठिकाणी त्यामध्ये बिघाड दिसत आहे.(Education Minister apologizes for website hang case! )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१० वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक दिवसभर हैराण झाले होते. वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. (Education Minister apologizes for website hang case!)