Dr Mehul Rathod Latur : प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, कारमध्ये आढळल्या इंजेक्शनच्या बाटल्या, पोलिस तपास सुरू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी मोठी घटना समोर आली आहे. लातूर (Latur) शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम. जे. हॉस्पिटलचे (M J Hospital) वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४५) (Dr Mehul Rathod) यांचा संशयास्पद मृत्यु (Death) झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

Dr. Mehul Rathod Latur, Shock over suspicious death of renowned cardiologist Dr. Mehul Rathod, injection vials found in his car, police investigation underway,

सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटनेला काही महिने उलटले असतानाच आता लातूर शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ मेहुल राठोड यांनी गुंगीचे औषध घेत आपली जीवनयात्रा संपवली. प्रथमदर्शनी त्यांनी आत्मघात केल्याचे सांगितले जाते, मात्र काही जणांनी यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी डॉ. राठोड हे आपल्या घरातून इनोव्हा कार घेऊन बाहेर पडले. त्यानंतर ते अंबाजोगाई रोड परिसरात गेले. दुपारी सुमारे दीड वाजल्यापासून त्यांची कार त्या परिसरात उभी असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, डॉ. राठोड यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांनी त्यांना वारंवार फोन केले. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. अखेर संध्याकाळी त्यांच्या कारचा ठावठिकाणा लागल्यानंतर पत्नी आणि सहकारी डॉक्टर घटनास्थळी पोहोचले.

कारमध्ये डॉ. राठोड गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डॉ मेहुल राठोड यांनी टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.

मेहुल राठोड यांचं बार्शी रोड येथे एम जे हॉस्पिटल आहे. बुधवारी दुपारी ते स्वतःची इनोव्हा गाडी घेऊन आंबेजोगाई रोड भागात गेले. या ठिकाणी गाडीतच त्यांनी गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन घेत आत्मघात केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांच्या कारमध्ये इंजेक्शन काही औषधाच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. घरातून ते सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निघाले होते. बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून या भागात ही गाडी दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टर राठोड यांच्या कुटुंबाकडून आणि दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना दुपारपासून फोन लावला जात होता. ते फोन उचलत नसल्याने शोधाशोध सुरु झाली. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांची गाडी आंबेजोगाई रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांची पत्नी प्रियांकाही डॉक्टर असून माहिती मिळताच त्या आणि डॉक्टरांच्या काही सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.डॉक्टर मेहुल राठोड यांना त्या अवस्थेत पाहून सगळेच घाबरले. मात्र त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. इतर माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. डॉ राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यविधी झाल्यानंतर गुरुवारी कुटुंबीयांकडे चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली तरी राठोड यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राठोड हे लातूरमधील नावाजलेले हृदयरोग तज्ज्ञ होते. बुधवारी ते त्यांच्या इनोव्हा कारने अंबाजोगाई रोड परिसरात गेले होते. दुपारी सुमारे1.30 पासून त्यांची कार तेथेच उभी होती, असं निदर्शनास आलं. बराच वेळ उलटूनही ते रुग्णालयात परतले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या शोधादरम्यान अंबाजोगाई रोड परिसरात त्यांची कार आढळून आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर डॉ. राठोड हे कारमध्ये गंभीर अवस्थेत होतें, असं आढळलं. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविॉण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

प्राथमिक तपासात पोलिसांना कारमधून इंजेक्शनच्या काही रिकाम्या काचेच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे डॉ. राठोड यांनी एखाद्या विषारी पदार्थाचे इंजेक्शन घेतले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्या शीश्यांमध्ये कोणता पदार्थ होता, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील सर्व पुरावे ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

डॉ. राठोड यांची गाडी सापडल्याचे कळताच त्यांची पत्नी, ज्या स्वतःही वैद्यकीय व्यवसायात आहेत, त्यांनी सहकारी डॉक्टरांसह घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार आणि परिसरातील आवश्यक नमुने तपासासाठी जप्त केले आहेत.

डॉ. राठोड यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचललं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस त्यांच्या मोबाईल फोनमधील माहिती, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व संबंधित बाबींची चौकशी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.