सरकारी डाॅक्टरच्या आत्महत्येने जिल्हा हादरला: सुसाईड नोटमध्ये समोर आले खळबळजनक कारण

डाॅ गणेश शेळके यांनी केली आत्महत्या; पाथर्डीत उडाली मोठी खळबळ

पाथर्डी  : वरिष्ठांकडून सतत होत असलेल्या जाचास कंटाळून एका डाॅक्टरने आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस  आली आहे.(dr-ganesh-shelke-committed-suicide)

याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणुन डॉ. गणेश शेळेके हे रूजू होते. सकाळपासून तणावात असलेल्या डाॅक्टर शेळके यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सदर उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होते त्याचवेळी डाॅक्टरांनी तेथील एका कर्मचार्‍याला कागद व पेन मागितला व त्यानंतर त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता.आपल्या दालनात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे.(dr-ganesh-shelke-committed-suicide)

डाॅक्टरांनी तेथील एका कर्मचार्‍याला कागद व पेन मागितला व त्यानंतर त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता बराचवेळ झाल्यानंतरही डॉ. शेळके हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांना आवाज दिला. मात्र तरीही काहीही प्रतिसाद न आल्याने तेथील कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडून पाहिले तर डाॅ. गणेश शेळके यांनी दालनातील छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले.(dr-ganesh-shelke-committed-suicide)

यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळवल्यानंतर सपोनि.कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.डॉ.शेळके यांनी कोणत्या कारणाने गळफास घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पाथर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान वरिष्ठांच्या जाचातून डाॅ शेळके यांच्या आत्महत्येमुळे कोरोना लसीकरण मोहिम आता वादात सापडली आहे.(dr-ganesh-shelke-committed-suicide)

मी डाॅ गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसिलदार, जिल्हाधिकारी जबाबदार. वेळेत पेमेंट न करणे कामाचा अतिरिक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे ,या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे. अशी सुसाईट नोट घटनास्थळी आढळून आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.(dr-ganesh-shelke-committed-suicide)