- Advertisement -

कोरोना मृत्यू : जामखेड तालुक्यातील मयत कोतवालाच्या कुटूंबाला 50 लाखांची मदत जाहीर ! (Corona dies: Rs 50 lakh aid announced for Mayat Kotwala’s family in Jamkhed taluka)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना महामारी काळात कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबीयांना 50 लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना महामारी काळात जामखेड तहसिल कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले कोतवाल कै. केरबा भाऊराव कारंडे यांचे कोरोना काळात कर्तव्यावर असताना दि 17 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या कुटूंबीयांसाठी सरकारने 50 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान आज 02 फेब्रुवारी रोजी मंजुर केले आहे. तसा शासन निर्णय आज सायंकाळी जामखेड तहसिल कार्यालयाला प्राप्त झाला आहे अशी माहिती तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. (Corona dies: Rs 50 lakh aid announced for Mayat Kotwala’s family in Jamkhed taluka)