पिक्चरचा क्लायमॅक्स संपलाय आता पुढची सगळी सुत्रे संजय राऊतांकडे : हिवाळी अधिवेशनात अनेकांची पोलखोल करणार – नवाब मलिक
समीर वानखेडे व भाजपवर नवाब मलिकांचे गंभीर आरोप
Drugs Case NCB Update Nawab Malik Live : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मलिक हे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले. क्लायमॅक्स संपला आता पुढची सुत्रे संजय राऊतांकडे असतील असे सांगत या संपुर्ण प्रकरणात अजून अनेक गंभीर गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेत मलिक यांनी दिले.
भाजपचे मोठे मोठे नेते NCB कार्यालय जात आहेत. मी आज नावं घेत नाही, अनेक नेत्यांच्या नावाबद्दल मी पुरावे गोळा करत आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी ते सगळे सादर करेल. हे अधिवेशन वादळी ठरेल. माझ्यावर देखील अनेक आरोप होतील. या पिक्चरचा क्लायमॅक्स झाला चित्र बदललं आहे. पुढचं सगळं संजय राऊत करतील. समीर वानखेडे यांची नोकरी जाईल तेव्हा या पिक्चरचा शेवट होईल अशी जोरदार फटकेबाजी मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
मलिक म्हणाले की, वानखेडेंकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षढयंत्र आहे. भाजप नेते या समीर वानखेडेंच्या पाठिशी उभे राहिले. भाजपचे मोठे मोठे नेते NCB कार्यालय जात आहेत. मी आज नावं घेत नाही, हिवाळी अधिवेशनात मी याबद्दल बोलणार आहे. काशिफ खानला अटक केल्यावर भाजपचं पितळ उघडं पडेल, असंही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, होय, मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. त्यांनी म्हटलं की, माझं गोडाऊन आहे. माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही. मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही. मी भंगारवाला आहे. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो. नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्याचे नट बोल्ट काढून त्याचे पाणी बनवणार, असंही मलिक म्हणाले.
अनेक नेत्यांच्या नावाबद्दल मी पुरावे गोळा करत आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मी ते सगळे सादर करेल. हे अधिवेशन वादळी ठरेल. माझ्यावर देखील अनेक आरोप होतील. या पिक्चरचा क्लायमॅक्स झाला चित्र बदललं आहे. पुढचं सगळं संजय राऊत करतील. समीर वानखेडे यांची नोकरी जाईल तेव्हा या पिक्चरचा शेवट होईल, असंही मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले की, आज मी DG NCB यांना पत्र लिहिलं आहे. 26 प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ज्यांनी फसवून लोकांना जेलमध्ये टाकले त्यांना न्याय मिळावा. काल मी एक ट्विट केलं होत picture अभी बाकी है आणि आज ते समोर येत आहे, असं ते म्हणाले.
मलिक म्हणाले की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता तो कोर्टात फेऱ्या मारत होता. जामीन सर्वांचा अधिकार आहे. पण त्यापासून वंचित ठेवण चुकीचं आहे.
मलिक यांनी म्हटलं की, पहिल्या पत्नीचा फोटो टाकला कारण त्यांची तशी इच्छा होती असं सांगण्यात आले. सध्याच्या पत्नी बद्दल मी काहीही बोललो नाही. ही लढाई धर्मा विरोधात नाही. काल वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिलं आणि मराठी असल्यामुळे मदत करा असे सांगत आहे. आणि मग नवाब मलिक जन्मापासून मुबईत आहे. त्याचं काय? असा सवाल करत भाजपकडून षड्यंत्र रचले जात आहे. फिल्म सिटी मुंबईतून बाहेर जावं, योगींनी त्यासाठी लखनऊ मध्ये फिल्म सिटी बनवली आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले.
दाढीवाला काशिफ खान हा Fashion tv चा हेड आहे. फॅशनच्या नावाने काशिफ खान पॉर्नचा धंदा करतो. तो समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखेडेंनी रोखलं असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी केला आहे. दाढीवाला काशिफ खान देशभरात फॅशन टीव्ही चालवतो. तो फॅशन च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो, ड्रग्जचा धंदा करतो. दाढीवाला आणि समीर वानखेडे यांची मैत्री आहे. काही अधिकारी मला सांगतात की, समीर वानखेडे हे त्या दाढीवाल्यावर करावाई करत नाहीत, असंही ते म्हणाले.