ब्रेकिंग न्यूज : कर्जतच्या राजकारणात मोठा भूकंप, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र फाळकेंची मोठी घोषणा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जतच्या राजकारणात बुधवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र फाळके यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कर्जत- जामखेड सह नगर जिल्ह्याच्या राजकारणातील राजेंद्र फाळके हे महत्वाचे नेते आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर राजेंद्र फाळके यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. फाळके यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे.
राजेंद्र फाळके यांनी प्रांताध्यक्ष शशिकांत पाटील यांना आपला राजीनामा पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी २०१८ मध्ये अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. आज जवळपास ७ वर्षाहून अधिकचा काळ झालेला असून पक्षामध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळणे अपेक्षित असते तसेच माझे कौटुंबिक कारणास्तव मी माझ्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. सदरचा राजीनामा मंजुर करावा असे या पत्रात म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि आमदार रोहित पवार यांच्यात गेल्या महिन्यांपासून शीतयुद्ध सुरु होते. त्यातूनच त्यांनी हा राजीनामा दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. फाळके यांनी दिलेल्या राजीनाम्याकडे अनेक अर्थाने पाहिले जात आहे. फाळके आता वेगळा राजकीय निर्णय घेणार की पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
राजेंद्र फाळके यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडले असले तरी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. आपण दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे फाळके यांनी सांगितले.