Big decision of Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय  : राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उघडली जाणार

प्रार्थनास्थळांसाठीची नियमावली जाहीर

 

मुंबई : Big decision of Thackeray government | कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा, प्रार्थनास्थळे चित्रपटगृह, नाट्यगृहे उघडण्याचे मोठे पाऊल ठाकरे सरकारने उचलले आहे.शुक्रवारी शाळा व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शनिवार सरकारने चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे.(Theaters reopen from 22 October in Maharashtra Big decision of Thackeray government )

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. 22 ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल.

ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे चित्रपट सृष्टीतून स्वागत केले जात आहे.

राज्यातील प्रार्थनास्थळांसाठी सरकारने जारी केली नियमावली.

7 ऑक्टोबरपासून उघडली जातील. त्यामुळे भक्त मंडळी एकाच वेळेस ठिकठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहेत. पण कोविडचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी, आणि प्रार्थनेसाठी येणाऱ्या मंडळींनी नेमके कोणते नियम पाळायचे याची नियमावलीच आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलीय. ती पुढील प्रमाणे. (maharashtra government allows temples and holy place to open from 7 october know all rules and guidelines)

1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणं अनिवार्य

2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश

3.ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेलं आहे त्यांनाच प्रवेश मिळेल

4.कोविड रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणं अनिवार्य, तसच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.

5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टनं ठरवायचं आहे. व्हेंटिलेशन, उपलब्ध जागा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अर्थातच त्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय ठेवावा.

6. प्रत्येकानं बुटं, चप्पला वाहनातच सोडाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.

7. धार्मिक स्थळाच्या परिसरातली दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं

8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावी.

9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.

10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावं. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.

11. लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी साबनानं हात धुवावीत, सॅनिटायजर मारावा.

12. धार्मिक स्थळांमध्ये बसताना सोशल डिस्टन्सिंग पाळला जावं. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढं ठेवावं.

13. मुर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.

14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठं कार्य ज्यामुळे गर्दी होईल असं करता येणार नाही.

15. भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.

16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.

17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील

web tital : Big decision of Thackeray government Theaters reopen from 22 October in Maharashtra