Big Breaking | चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी दिली घटनेची धक्कादायक माहिती

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

चुंबळी शिवारातून जाणारी महापारेषणची टाॅवर लाईन कोसळून आनंद प्रभाकर हुलगुंडे या 25 वर्षीय  युवकाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुपारी ०२ वाजताचे अपडेट 

आष्टी 132 kv ते खर्डा 132 या वीज उपकेंद्राला जोडणाऱ्या नवीन टाॅवर लाईनचे काम नुकतेच झाले आहे. ही टाॅवर लाईन महापारेषण कंपनीची आहे.  ही लाईन जामखेड तालुक्यातील अनेक गावातून आष्टीहून खर्ड्याकडे गेली आहे. चुंबळी शिवारातूनही ही टाॅवर लाईन गेली आहे. मयत आनंद हुलगुंडै या तरूणाच्या शेतातून ही लाईन गेली होती. महापारेषणकडून ठरल्याप्रमाणे हुलगुंडै यांना मोबदला दिला नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माझ्या शेतात टाॅवर नको असे आनंद सतत म्हणत होता अशीही नवी माहिती समोर आली आहे.

दुपारी ०२ वाजताचे अपडेट

दरम्यान या घटनेसंदर्भात महापारेषणचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर संतोष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आष्टी 132 केव्ही ते खर्डा 132 केव्ही विज केंद्राला जोडणारी लाईन चुंभळी येथून जाते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही टाॅवर लाईन गेली आहे त्या शेतकऱ्यांना पिक नुकसान म्हणून भरपाई अदा केलेली आहे. अशीच  नुकसान भरपाई मयत आनंद यांचे वडील प्रभाकर हुलगुंडे यांना तीन लाख सहा हजार रूपये चेकने दिले होते. आमचे कामही पुर्ण झाले आहे. पण रात्रीच्या वेळी आनंद हुलगंडे याने टाॅवरचे सपोर्ट कापले त्यामुळे टाॅवर एका बाजूला कलला व तो हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असे चव्हाण यांनी सांगितले.

मयत आनंद या तरूणाचे गेल्याच वर्षी लग्न झाले होते. त्याच्या मागे आई,वडील, पत्नी, भाऊ व बहिण असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने हुलगुंडे परिवारावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

 

चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

दुपारी १२ वाजताचे ब्रेकिंग अपडेट

चुंबळी शिवारातून जाणारी महापारेषणची टाॅवर लाईन कोसळून आनंद प्रभाकर हुलगुंडे या 25 वर्षीय  युवकाचा मृत्यू झाला आहे.शुक्रवारी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Big Breaking | चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !
टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

दुपारी १२ वाजताचे ब्रेकिंग अपडेट

दरम्यान सदर मृत युवकाचा मृतदेह अजुनही टॉवरमध्ये अडकलेला आहे. तो बाहेर काढण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस घटनास्थळी आहेत. तपास सुरू आहे.

चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

 

चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

सुचना : संबंधित ब्रेकिंग न्यूज अत्ताच आमच्या हाती आली आहे. घटनेचे अपडेट जसजसे आमच्यापर्यंत पोहचतील तसतसे आम्ही ती माहिती इथेच अपडेट करत राहू..  तुम्ही हे पेज सतत रिफ्रेश करत रहा