ashadhi wari 2022 । आषाढी एकादशीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी (लालपरी) सज्ज, सविस्तर जाणून घ्या ST महामंडळाचे नियोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटानंतर यंदा होत असलेल्या आषाढी एकादशी 2022 ला दरवर्षीपेक्षा यंदा गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. आषाढी यात्रेसाठी राज्यातील लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला दाखल होतील. दरवर्षीपेक्षा यंदा गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे. (ashadhi wari 2022, ST (Lalpari) ready for the service of Warakaris going to Ashadi Ekadashi 2022 , know in detail the planning of ST Corporation in ashadhi wari 2022,)

आषाढी एकादशी यात्रेसाठी लालपरी सज्ज झाली आहे. यंदा पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 04 हजार 700 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, 6 जुलै ते 14 जुलै 2022 या काळात विशेष एसटी बसेस धावणार आहेत. तसेच आठ जुलै रोजी वाखरी येथील माऊलीच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी राज्यातल्या सर्व बस स्थानकांमधून विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांनी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी परब यांनी केले.

तसेच राज्यभरातून पंढरपूर येथे दाखल होणाऱ्या भाविकांसाठी पंढरपूर परिसरामध्ये चार तात्पुरत्या बसस्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा पांडुरंग (आयटीआय कॉलेज), विठ्ठल कारखाना येथे तात्पुरते बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी महामंडळाकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले. (ashadhi wari 2022, ST (Lalpari) ready for the service of Warakaris going to Ashadi Ekadashi 2022 , know in detail the planning of ST Corporation in ashadhi wari 2022,)

असे असेल पंढरपुरातील बस स्थानकांचे नियोजन

  1. चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, रायगड,सातारा ठाणे, पुणे विभाग व पंढरपूर
  2. भीमा यात्रा देगाव बसस्थानक : औरंगाबाद नागपूर व अमरावती प्रदेश
  3. विठ्ठल कारखाना बसस्थानक : अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव
  4. पांडुरंग आयटीआय बसस्थानक : कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील या विभागातून सोडल्या जाणार 4700 बसेस

  • औरंगाबाद विभाग 1200 एसटी बसेस.
  • मुंबई विभाग 500 एसटी बसेस.
  • पुणे विभाग 1200 एसटी बसेस.
  • नागपूर विभाग 100 एसटी बसेस.
  • नाशिक विभाग 1000 एसटी बसेस.
  • अमरावती विभाग 700 एसटी बसेस.

पंढरपूरची आषाढी यात्रा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या यात्रेच्या दिवशी अनेक वारकरी आणि भाविक एसटी बसने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी पुन्हा सज्ज

एसटीच्या प्रवासी वाहतुकीला त्यामुळे मोठे महत्त्व असते, कारण वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जाणे आणि परत आपल्या घरी आणून सोडणे हे गेल्या अनेक वर्षांपासून लालपरी अर्थात एसटी करत आलेली आहे. यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी पुन्हा सज्ज झाली आहे त्यामुळे यंदाच्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविकांनी आणि वारकऱ्यांनी एसटी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे