सामाजिक कार्यकर्ते लतिफभाई शेख यांना मातृशोक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील हळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लतिफभाई शेख यांच्या मातोश्री आशाबी वजीर शेख यांचे शनिवारी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 78 वर्षांच्या होत्या. प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार सत्तार शेख व इंजिनिअर इम्रान शेख यांच्या त्या आज्जी होत्या. त्यांच्यामागे सुना, नातवंडे, दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्यावर हळगाव येथील कब्रस्तानमध्ये शनिवारी रात्री 11 वाजता दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईकांमध्ये त्या “आम्मा” या नावाने लोकप्रिय होत्या. जुन्या काळातील दाई म्हणून त्या परिसरात लोकप्रिय होत्या त्यांच्या हातून शेकडो महिलांचे यशस्वी बाळंतपण झाले होते.