- Advertisement -

Maharashtra Bhushan Award 2020 : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ख्यातनाम गायिका आशा भोसले (Famous singer Asha Bhosale) यांना सन 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan award) देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan award) निवड समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी (Maharashtra Bhushan award) गायिका आशा भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Famous singer Asha Bhosale gets Maharashtra Bhushan award )

Maharashtra Bhushan award
Famous singer Asha Bhosale gets Maharashtra Bhushan award

या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले (Famous singer Asha Bhosale gets Maharashtra Bhushan award)