GBS Outbreak In Pune Pimpari Chinchwad : पुणे व पिंपरी चिंचवड भागात जीबीएसचा उद्रेक होताच प्रशासनाकडून ५२२८३ घरांचे सर्व्हेक्षण, १२७ पैकी २० जीबीएस रूग्ण व्हेंटिलेटरवर, जीबीएस आजार संसर्गजन्य आहे का ? जाणून घ्या
GBS Outbreak In Pune Pimpari Chinchwad : पुणे व लगतच्या परिसरात जीबीएस आजाराने हाहाकार उडवून दिला आहे.अतिशय दुर्मिळ असणाऱ्या GBS आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्याने सर्वांचेच धाबे दणाणून गेले आहेत.पुण्यात सध्या १२७ रुग्ण आढळून आले आहेत.त्यातील २० रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. राज्यात अत्तापर्यंत जीबीएसने दोन बळी (GBS Death In Maharashtra) घेतले आहेत. जीबीएस आजाराचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. (GBS outbreak latest news in marathi)

पुण्यात आज पर्यत एकुण १२७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी २० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. तसेच २ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. (gbs death in pune) यापैकी ७२ रुग्णांची GBS म्हणून निदान निश्चिती झाली आहे. यापैकी २३ रुग्ण पुणे मनपा, ७३ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत, १३ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा व ९ रुग्ण पुणे ग्रामीण व ९ रूग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.आज एक GBS रुग्णाची नोंद झाली आहे आणि उर्वरित १५ रुग्ण मागील दिवसामधील आहेत.

पुणे व परिसरात जीबीएस आजाराचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सिंहगडरस्ता भागातील किरकटवाडी, नांदेड सह आदी भागात जीबीएसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. या भागात राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिली. त्याचबरोबर केंद्रीय पथकानेही पाहणी केली आहे.
जीबीएस रुग्णांचे १२१ शौच नमुने व २०० रक्त नमुने तपासणीचा अहवाल आला समोर
जीबीएस रुग्णांचे १२१ शौच नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत त्यापैकी २१ नोरो व्हायरस व ५ शौच नमुने कॅम्फेलोबॅक्टर जेजुनी साठी पोझीटीव्ह आले आहेत.२५ सी एस एफ नमुने तपासणी करण्यात आले, त्यापैकी १ नमुना ईपस्टीन बार व्हायरस पोझीटीव्ह आला आहे. एकूण २०० रक्त नमुने राष्ट्रीय विषाणु संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. सर्व नमुने झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया साठी निगेटिव्ह आहेत.

शहराच्या विविध भागातील १४४ पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य आहेत.

५२२८३ घरांचे सर्व्हेक्षण
पुणे मनपा व जिल्ह्यातील बाधित भागामध्ये सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. घरोघरी सर्वेक्षण अंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा ३४१७७ घरे, पिंपरी चिंचवड मनपा ७८५२ घरे व पुणे ग्रामीण १०२५४ अशा एकूण ५२२८३ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
जीबीएस आजार म्हणजे काय ? (गुलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?)
GBS हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. जिथे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो. हा आजार दुर्मिळ श्रेणीत गणला जातो. या आजारांवरील उपचाराचा खर्च लाखोंच्या घरात आहे.
जीबीएस आजाराची लक्षणे –
- अ) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा
- ब) अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आस किवा कमजोरी.
- क) डायरिया (जास्त दिवसांचा)
जीबीएस आजार संसर्गजन्य आहे का ?
जीबीएस हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होणारा अतिशय दुर्मिळ असा आजार आहे. जीबीएस हा आजार संसर्गजन्य तसेच अनुवंशिक आजार नाही. रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करत असल्याने हा आजार बळावतो. या आजाराचे मुळ नेमके काय ? यावर अजून ठोस संशोधन झालेले नाही. नोरो व्हायरस व कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीमुळे हा आजार होतो. पुण्यातील बाधित परिसरातील नमुने तपासणीत हे जीवाणू व विषाणू आढळून आले आहेत.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी
- अ) पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. पाणी उकळून पिणे.
- ब) अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- क) वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
- ड) शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (chicken, mutton) खावू नये.
- पिण्याचे पाणी स्वच्छ असावे
- पाणी उकळूनच प्यावे
- पिण्यापुर्वी पाणी गाळून प्यावे
- जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवावे
- काहीही खाण्यापूर्वी प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणांना कळवावे.
