आषाढी वारी 2023 : वारकऱ्यांसाठी विमा संरक्षण, राज्य सरकारचा मोठा निर्णय, विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेची सरकारकडून घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आषाढी वारी 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील लाखो वारकरी पायी दिड्यांच्या माध्यमांतून विठूनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत दंग झाला आहे. अश्यातच राज्यातील वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. (Vitthal Rukmini Warkari Vima Chhatra Yojana)

Aashadhi Wari 2023, State Government's big decision for Warkari, Vitthal Rukmini Warkari Bima Chhatra Yojana announced by the government!

पंढरपूरच्या आषाढी वारीतील सहभागी वारकऱ्यांना वारीच्या ३० दिवसांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. (Vitthal Rukmini Warkari Bima Chhatra Yojana)

वारीदरम्यान वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व, विकलांगता आल्यास १ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तर आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल, असाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.