दिवेकर हत्याकांड : अखेर निष्पाप भावा-बहिणीचे मृतदेह सापडले, रात्री उशिरापर्यंत विहीरीत सुरू होता शोध, त्या चिमुरड्यांचा काय दोष? वरवंड गाव झाले सुन्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील वरवंड येथील डाॅ अतुल दिवेकर यांनी आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या करण्याबरोबरच स्वता: आत्महत्या करण्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. डाॅ अतुल दिवेकर (atul divekar veterinary) यांनी पत्नीसह दोन मुलांची हत्या का केली याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पत्नीशी होणाऱ्या सततच्या कौटुंबिक वादामुळे डाॅ अतुल दिवेकर यांनी आपले कुटुंब संपवले, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.(Atul Divekar latest news)

atul divekar veterinary, divekar massacre, bodies of innocent brother and sister were found in well, what is fault of those little boy's? Varvand village became numb, atul divekar latest news,

व्यवसायाने पशुवैद्यकीय डाॅक्टर असलेल्या डाॅ अतुल दिवेकर (atul divekar veterinary) यांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते. त्यांचा व्यवसाय चांगला सुरु होता. पत्नी शिक्षिका होती, सुखवस्तू कुटुंब होतं, असे असतानाही अतुल दिवेकर यांनी टोकाचा निर्णय घेत अख्खं कुटूंब संपवून टाकलं, पती पत्नीच्या वादातून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे, परंतू या घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांचा नाहक बळी गेला. यामुळे वरवंड गाव निशब्द झालं आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेनं राज्यात खळबळ उडवून दिलीय.

वरवंड येथील डाॅ अतुल दिवेकर (Atul divekar Varvand) यांनी आपल्या पत्नीचा दोरीने गळा आवळत खून केला. त्यानंतर घरापासून जवळच असलेल्या एका विहीरीत आपल्या पोटच्या लेकरांना टाकत तिघांची हत्या केली. त्यानंतर स्वता: आत्महत्या केली. ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिस आणि वरवंड ग्रामस्थ चक्रावून गेले होते.

घरात पती – पत्नीचे मृतदेह आढळले. मुलांचे मृतदेह विहीर असल्याचे घरात सापडलेल्या चिठ्ठीवरून समजले. त्यानंतर पोलिस व ग्रामस्थांनी मृतदेहांच्या शोधासाठी विहीर गाठली. विहिरीला पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी येत होते. तीन चार वीज पंप लावून पाणी उपसण्यात आले. रात्री उशिरा दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह पाहताच उपस्थित पोलिसांसह ग्रामस्थांच्या डोळ्यात आश्रू आले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने यावेळी सर्वजण निशब्द झाले होते.

यावेळी यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण हे सर्व अधिकारी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होते. चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, अतुल दिवेकर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे हत्याकांड घडवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचे मुळ शोधण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकाने वेगाने तपास हाती घेतला आहे.

दौंड तालुक्यातील वरवंड येथील चैताली पार्क येथे राहत असलेल्या डाॅ अतुल शिवाजी दिवेकर (Dr Atul Shivaji Divekar) यांच्या घरातून ही धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेत पल्लवी अतुल दिवेकर (डाॅ अतुल यांची पत्नी) वेदांतिका (मुलगी) अदत्विक (मुलगा) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर डाॅ अतुल दिवेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रात्री उशिरा वेदांतिका (मुलगी) अदत्विक (मुलगा) या दोन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात पोलिसांना यश आले.