Zombie Virus News : 48 हजार 500 वर्षे जून्या Zombie Virus चा जगाला धोका, कोरोनापेक्षा भयानक महामारीचा वैज्ञानिकांनी दिला जगाला इशारा

Zombie Virus News : कोरोनामुळे दोन वर्षे टप्प्याटप्याने जगभर लॉकडाऊन लावण्यात आला होता. संपुर्ण जग ठप्प झालं होतं. लॉकडाऊन लावण्यात आला होता. जगात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता. जग कोरोना महामारीच्या स्मृतीतून सावरत असतानाच आता जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. जगावर पुन्हा एकदा कोरोनानंतर आणखीन एका भीषण महामारीचे संकट घोंघावू लागले आहे. झोम्बी व्हायरस असं या नव्या संकटाच नाव आहे. वैज्ञानिकांनी याबाबत जगाला सावधानतेचा इशारा दिला आहे. (zombie virus 2024)

48 thousand 500 years old Zombie Virus is a threat to world, scientists have warned of an epidemic worse than Corona, Zombie Virus latest news,

आर्कटिक आणि इतर बर्फाळ प्रदेशांमधील बर्फाच्या डोंगरांखाली दबलेल्या विषाणूबाबत वैज्ञानिकांनी आरोग्य संघटनेला इशारा दिला आहे. द गार्डियनच्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिक पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे झोम्बी व्हायरस बाहेर निघू शकतो आणि यामुळे भयावह जागतिक आरोग्य आणीबाणी निर्माण होऊ शकते. ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू येथील बर्फाखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

पर्माफ्रॉस्ट ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा पृष्ठभागाच्या खाली गोठलेला बर्फाचा थर आहे. यामध्ये माती आणि वाळूदेखील असते. याच्याभोवती बर्फाचा मोठा थर असतो. परंतु, अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढू लागलं आहे. परिणामी जगभरातील अनेक प्रदेशांमधला बर्फ वितळू लागला आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या बर्फांखाली दबलेल्या काही विषाणूंचा धोकादेखील वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक धोका झोम्बी व्हायरसचा असल्याचे बोलले जात आहे.

झोम्बी व्हायरस या नव्या विषाणूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी सायबेरियामधील पर्माफ्रॉस्टचे काही नमुने घेतले आणि त्यावर काही प्रयोग केले. या संशोधनादरम्यान, बर्फाखाली दबलेल्या विषाणूची माहिती मिळाली आहे. संशोधन करणाऱ्या या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिकमध्ये आम्हाला सापडलेला विषाणू हजारो वर्षे बर्फाखाली दबला होता.

रॉटरडॅममधील इरास्मस मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञ मॅरियन कूपमॅन्स म्हणाल्या, पर्माफ्रॉस्टखाली कोणकोणते विषाणू दबले गेले असावेत, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. परंतु, आम्हाला वाटतं की, तिथे असे काही विषाणू आहेत जे या संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात. इथल्या विषाणूंमध्ये रोगांची मोठी साथ पसरवण्याची क्षमता असू शकते. जसे की पोलिओचा एक जुना व्हेरिएंट या प्रदेशात असू शकतो. येथून नवी आव्हाने निर्माण होऊ शकतात, असं मानूनच आपल्याला संशोधन करावं लागेल. अये ते म्हणाले .

जग आता कोठे कोव्हिडच्या जागतिक संकटातून सावरले आहे. पण संशोधकांना आता नवी भीती सतावत आहे. आर्क्टिक येथे परमाफ्रॉस्टचे थर आहेत. वाळू, गाळ, लहान दगडगोटे यांना बर्फ बांधून ठेवते, या थराला परमाफ्रॉस्ट असे म्हटले जाते. हे थर काही वर्ष अगदी दोन वर्षं ते अगदी सात लाख वर्षं जुने आहेत. हे थर आता वितळू लागले आहेत. यातून काही अतिशय धोकादायक विषाणू बाहेर पडले तर यातून भयंकर मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. Zombie Viruses

जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढ यामुळे हे विषाणू बाहेर पडून पृथ्वीवर थैमान घालू शकतात, असे गुणसूत्रांवर संशोधन करणारे जीन मिशेल क्लाव्हेरी यांनी दिला आहे. क्लाव्हेरी Aix – Marseillie Universityचे प्राध्यापक आहेत. हा धोका खरा आहे, आणि आपल्याला यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. ही बातमी इकॉनॉमिक टाइम्समध्ये देण्यात आली आहे.

संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांना परमाफ्रॉस्टमधील विषाणूंबद्दल चिंता वाटते. परमॉफ्रॉस्टचा सर्वांत खोलवर थर हा काही दशलक्ष वर्षांपासून गोठलेला आहे. तर माणसाचा इतिहास हा तीन लाख वर्षांचा आहे. त्यामुळे आधुनिक मानवात परमॉफ्रॉस्टमधील विषाणूंच्या विरोधात रोगप्रतिकार शक्ती नाही. क्लाविर म्हणाले, “यातील कितीतरी विषाणू आणि मनुष्य यांचा कधी संपर्कच आलेला नाही, ही काळजीची स्थिती आहे. निअँडरथल मानवाला जर अशा अनभिज्ञ विषाणूंचा प्रादूर्भाव झाला असता तर काय झाले असते? आता ही शक्यता खरी वाटू लागली आहे.”

मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

Aix-Marseille University चे शास्त्रज्ञ जीन मिशेल यांनी या झोम्बी व्हायरसबाबत जगाला धोक्याचा इशारा दिला आहे. झोम्बी व्हायरस संदर्भातील एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात हा व्हायरस पसरला तर काय स्थिती निर्माण होवू शकते याची भिती देखील व्यक्त करण्यात आली आहे. सायबेरियन भागातून अनेक प्रकारचे विषाणूचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये एक विषाणू सुमारे 48,500 वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.

झायलाजीन नावाच्या औषधामुळे झोम्बी व्हायरस पसरतोय अमेरिकेत रस्त्यावर लोक चित्र विचित्र हावभाव करताना दिसतायेत. या लोकांकडे पाहिल्यानंतर हजारो वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जातोय.. ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय. याचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतायेत.

झायलाजीन (Xylazine) औषध प्राण्यांसाठी बनवण्यात आलं असून त्याचा वापर प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र हेच औषध माणसांनी घेतलं तर ती झोम्बीसारखं वागू लागतात. सुरूवातीला या औषधांचा वापर फिलाडेल्फियात झाला. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिलिस आणि इतर मोठ्या भागातही झायलाजीनचा साठा पोहचलाय. या औषधांमुळे अनेकांची त्वचा सडू लागलीय. या औषधाचे परिणाम इतके घातक आहेत की, बाधित व्यक्तीचा एखादा अवयवही कापून टाकावा लागू शकतो.

अलिकडेच रशियन शास्त्रज्ञांनी तब्बल 48 हजार वर्षं बर्फाखाली दाबल्या गेलेल्या एका व्हायरसला जिवंत केल्याचा दावा फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी केला होता. या व्हायरसचं वैज्ञानिक नाव पंडोराव्हायरस एडिमा असं आहे. या बातमीनंतर आता अमेरिकेत झोम्बीचे रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा सा-या जगाचं टेन्शन वाढलंय.