जामखेड : पल्लवी गोलेकर यांनी जिंकली 21 हजाराची पैठणी, बिभीषण धनवडे आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने मोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाजपाचे शहराध्यक्ष बिभीषण मामा धनवडे आणि जगदंबा महिला मंडळ यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला जामखेड शहरातील महिलांनी तुफान प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या गर्दीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. जगदंबा महिला मंडळाने घरोघरी जाऊन निमंत्रण देत केलेल्या यशस्वी नियोजनामुळे कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळली होती.

Jamkhed, Pallavi Golekar won 21,000 Paithani, Bibhishan Dhanwade organized Khel Paithani program broke all crowd records

सिने कलावंत क्रांती नाना मळेगांवकर आणि टिव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर यांनी सादर केलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाने प्रचंड धम्माल उडवून दिली. हा कार्यक्रम तब्बल पाच तास चालला. या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळ, नृत्य सादर केले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसून आला. तरूण मुली, महिला आणि वृध्द महिलांनी कार्यक्रमात मोठी धम्माल उडवून दिली.

Jamkhed, Pallavi Golekar won 21,000 Paithani, Bibhishan Dhanwade organized Khel Paithani program broke all crowd records

यावेळी पार पडलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात पल्लवी तुषार गोलेकर यांनी पहिला क्रमांकाची पैठणी जिंकली. तर अनिता मारुती गिते यांनी दुसऱ्या क्रमांकाची पैठणी जिंकली. तर दैवशाला गणेश गुळवे यांनी तिसर्‍या क्रमांकाची पैठणी जिंकली तर चौथ्या क्रमांकाची पैठणी संध्या अनंता आष्टेकर यांनी जिंकली वर्षा सागर माकुडे यांनी पाचव्या क्रमांकाची पैठणी जिंकली.

Jamkhed, Pallavi Golekar won 21,000 Paithani, Bibhishan Dhanwade organized Khel Paithani program broke all crowd records

यावेळी कार्यक्रमासाठी आमदार राम शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे, रमेश वराट दाजी, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसभापती रविंद्र सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रविण चोरडिया, भाजपा तालुका सरचिटणीस लहू शिंदे, शरद कार्ले, सलिम बागवान, कैलास माने, सुमित वराट, प्रविण सानप, तात्याराम पोकळे, गोरख घनवट, उध्दव हुलगुंडे, मोहन देवकाते, आमदार राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डाॅ अल्ताफ शेख, अजय सातव, शुभम हुलगुंडे, वैभव कार्ले, ऋषीकेश मोरे, साहिल भंडारी, सुरज निमोणकर, शुभम धनवडे सह जगदंबा महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.