साई गणेश मंडळांकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या शिक्षिकेसह NMMS परिक्षतेतील गुणवंतांचा गौरव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जामखेड तालुक्यात सुध्दा विविध कार्यक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा होत आहे. जामखेड शहरातील साईनगर येथील साई गणेश मंडळाकडून गुणवंतांचा गौरव करून हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सहा वर्षांपासून जोपासली जात आहे.

Honoring meritorious students in NMMS exam with teacher winning Adarsh ​​Shikshak award from Sai Ganesh Mandal in jamkhed

जामखेड शहरातील साईनगर येथील साई गणेश मंडळाकडून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. यंदा या मंडळांकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या अनिता पवार (पिंपरे) यांच्यासह NMMS परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे विद्यार्थी ज्ञानेश्वरी भोगील,  यांचा गौरव करण्यात आला.

Honoring meritorious students in NMMS exam with teacher winning Adarsh ​​Shikshak award from Sai Ganesh Mandal in jamkhed

यावेळी जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत, राजेश भोगील,आंधळे मेजर, माळवे मेजर,अंकुश तात्या,काकडे सर,डोके सर, कडबने सर,भोंडवे सर,माने साहेब, हजारे सर, खेत्रे साहेब, जाधव साहेब, नागरगोजे साहेब, गायकवाड साहेब,कदम सर,अविनाश कडू,संतोष जायभाय,केळकर सर,कसबे सर, आव्हाड सर, सुपेकर साहेब, सुळे साहेब सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Honoring meritorious students in NMMS exam with teacher winning Adarsh ​​Shikshak award from Sai Ganesh Mandal in jamkhed

साई गणेश मंडळांकडून मागील सहा वर्षांपासून साई नगर परिसरातील गुणवंतांचा गौरव करण्याची परंपरा सुरू केली आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Honoring meritorious students in NMMS exam with teacher winning Adarsh ​​Shikshak award from Sai Ganesh Mandal in jamkhed