Taekwondo : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गायञी बारगजेला कांस्यपदक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  रत्नागिरी येथे झालेल्या 33 व्या महाराष्ट्र राज्य जुनिअर तायक्वांदो स्पर्धेत जामखेड येथील गायत्री संतोष बारगजे हिने कांस्य पदक जिंकले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Bronze Medal to Gayatri Bargaje in State Level Taekwondo Competition

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथे 24 ते 26 जून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील 14 खेळाडुंनी सहभाग घेतला होता.

http://jamkhedtimes.com/big-news-big-decision-of-school-education-department-regarding-fifth-and-eighth-exams-education-commissioner-suraj-mandhare-ias/

या स्पर्धेत जामखेडच्या गायत्री बारगजे हिने कांस्य पदक जिंकले. स्पर्धेमध्ये खेळताना तीला प्रशिक्षक म्हणून दिनेशसिंग राजपूत (लोणी) व लक्ष्मण शिंदे (संगमनेर) तर व्यवस्थापक पुजा शिंदे (संगमनेर) यांचे मार्गदर्शन लाभले.

अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक संतोष बारगजे यांच्याकडे जामखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील प्रांगणात गायत्रीने नियमित सराव केला आहे.

तीच्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे, उपाध्यक्ष किरण बांगर, सहसचिव अल्ताफ कडकाले, रवींद्र शिर्के, सादिक शेख, देवेंद्र बारगजे, सौ सुरेखा मुंडे, संजय बेरड, दत्तात्रय उदारे, पाथर्डीचे प्रशिक्षक अंबादास साठे व गोरक्षनाथ गालम, बाबासाहेब क्षिरसागर (राहुरी), राहाता तालुक्यातील तायक्वांदो प्रशिक्षक महेश मुरादे, प्रभाकर शेळके, अमोल बोधक, ब्रह्मचैतन्य राजगुरू यांनी अभिनंदन केले आहे