DJ Tim Bergling Google Doodle | डीजे टीम बर्गलिंगला त्याच्या 32 व्या वाढदिवसानिमित्त Google ने एक अद्भुत डूडल समर्पित केले

DJ Tim Bergling Google Doodle : टिम बर्गलिंगला एविसी (Avicii) म्हणून अधिक ओळखले जाते.

DJ Tim Bergling Google Doodle : स्वीडिश सुपरस्टार, निर्माता, गीतकार, कलाकार आणि गीतकार टिम बर्गलिंगचा 32 वा वाढदिवस गुगलने शानदार केला आहे. गुगलने आज टिम बर्गलिंगला अनोखी भेट दिली आहे. गुगलने आजचे गुगल डुडल टिम बर्गलिंगला समर्पित केले आहे.

जाणून घेऊयात कोण आहे टिम बर्गलिंग

टीम बर्गलिंगला ( DJ Tim Bergling)जगभरात एविसी म्हणून ओळखले जाते. एविसीचा (Avicii) जन्म सन 1989 मध्ये स्टॉकहोममध्ये झाला होता, टिमने 16 व्या वर्षीपासुन आपल्या संगीत कलेचा प्रवास सुरू केला. विशेष म्हणजे बेडरूममधून संगीत वाजवायला सुरुवात केली होती.

सन  2011 मध्ये एविसी’ (Avicii) नावाने ‘लेव्हल्स’ हे नृत्यगीत रिलीज केले. तेव्हा आंतरराष्ट्रीय संगीतामध्ये त्याचे आगमन झाले,असे म्हटले जाते की या कलाकाराने 2011 ते 2016 पर्यंत जागतिक स्तरावर सुमारे 220 सेट खेळले. चार्ट-बस्टिंग इलेक्ट्रॉनिक ट्रॅक तयार करण्याव्यतिरिक्त,एविसी हे पहिले डीजे आणि उत्पादकांपैकी एक होते जे सामान्यतः गायक आणि वाद्य वादकांसाठी आरक्षित स्पॉटलाइट सामायिक करतात.

बर्गलिंगने (DJ Tim Bergling)आपल्या छोट्या कारकिर्दीत इलेक्ट्रॉनिक संगीताला एक वेगळी ओळख दिली आहे. एविसीच्या सर्वात आयकॉनिक ट्रॅक “वेक मी अप”, मधील एका सेटवर आजचा गुगल डूडल व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा डूडल व्हिडिओ कलाकार एलिसा विनन्स, ऑलिव्हिया वायन आणि सोफी डियाओ यांनी तयार केला आहे.

टीम बर्गलिंगला (DJ Tim Bergling) त्याच्या कारकीर्दीत डझनहून अधिक संगीत पुरस्कार देण्यात आले. जसे की सर्वोत्कृष्ट इनोव्हेटर 2012 साठी स्वीडिश ग्रॅमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कलाकार 2014 तसेच सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक नृत्य कलाकार 2014 साठी जागतिक संगीत पुरस्कार.त्यांना अनेक ग्रॅमी पुरस्कारांसाठीही नामांकन मिळाले होते.

टिम बर्गलिंगचा दुर्दैवी मृत्यू

टीम बर्गलिंग मानसिक आजारांशी वर्षानुवर्षे झुंजत होता आणि 2018 मध्ये त्याने आत्महत्या केली. जगाला उत्कृष्ट संगित रचना देणाऱ्या टीमचा आत्महत्येने शेवट होणे त्याच्या करोडो चाहत्यांना धक्का देणारे होते. टीमच्या वाढदिवसानिमित्त आज गुगलने दिलेली अनोखी भेट टीमच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरली आहे.

पहा गुगलने बनवलेला डुडल व्हिडीओ