ICC Champions Trophy 2025 Schedule : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने कधी ? जाणून घ्या
ICC Champions Trophy 2025 schedule : नव्या वर्षांत ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५’ चा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेला १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरूवात होणार असून ९ मार्च २०२५ रोजी स्पर्धेचा अंतिम सामना असणार आहे. पाकिस्तान आणि दुबई युएई (Dubai UAE) मध्ये या स्पर्धेचे सामने होणार आहेत.
भारताने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यामुळे २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यांची घोषणा केली आहे.यापुर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा २०१७ मध्ये झाली होती. तब्बल ७ वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा भरवली जात आहे. नव्या वर्षात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघ पुन्हा आमने सामने भिडणार आहेत. संपुर्ण क्रिकेट विश्वाला या रोमांचकारी सामन्याची उत्सुकता लागली आहे. (ICC Champions Trophy 2025 Schedule )
चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ स्पर्धेत बांगलादेश, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ गट अ गटात आहेत. तर ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा लाहोर, कराची, रावळपिंडी आणि दुबई युएईमधील स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. (ICC Champions Trophy 2025 Schedule )
ICC Champions Trophy 2025 Schedule : ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२० फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२१ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
२२ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
२४ फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
१ मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
२ मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
४ मार्च – उपांत्य फेरी १, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
५ मार्च – उपांत्य फेरी २, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
९ मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर
उपांत्यपूर्व १ मध्ये भारत पात्र ठरला तर तो सामना दुबईत होईल.
पाकिस्तान पात्र ठरल्यास उपांत्य फेरी २ सामना लाहोर येथे होईल
जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल