जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये आढळला बेवारस मृतदेह, उडाली मोठी खळबळ 

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील आघी रोडवर असलेल्या टोकवस्ती परिसरात आज सकाळी एका 70 वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

सदर मयत वृध्द व्यक्ती  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हळगाव – आघी परिसरात भटकत होती. ती व्यक्ती बहुदा मनोरुग्ण असल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

काल रात्री सदर मयत व्यक्ती ही हळगाव येथील टोकवस्तीवर झोपली होती. आज सकाळी टोक वस्तीवरील काही नागरिकांना सदर व्यक्ती मृत अवस्थेत आढळली. मृत व्यक्तीने उलट्या केलेल्या होत्या तसेच त्या व्यक्तीला हगवण लागल्याचे घटनास्थळी आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुरेश ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना कळवली. त्यानंतर पोलिस नाईक अजय साठे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरच सदर व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Unclaimed body found in Halgaon in Jamkhed taluka

सदर मृत व्यक्तीचे नाव गावाबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. सदर व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्यांनी जामखेड पोलिस स्टेशनच्या 02421 -221033 या नंबरवर संपर्क साधावा असे अवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.