ठिबक सिंचन चोरी प्रकरणी दोघांना अटक, चोवीस तासांत जामखेड पोलिसांनी लावला आरोपींंचा छडा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील गिरवली येथून एका शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचनचे पाईप चोरी जाण्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत या प्रकरणातील दोघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्याची धडक कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे.

दोन लाख रूपये किंमतीचे गहाळ मोबाईल शोधण्यात जामखेड पोलिसांना यश, मोबाईलधारकांना मोबाईल केले परत

जामखेड तालुक्यातील गिरवली शिवारातील चौंडी रोड लगत असलेल्या गट नंबर 131 व गट नंबर 132 ही शेती आहे. या शेतात मिठू महादेव खोसे आणि सुरेश लालासाहेब खोसे या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केलेली आहे. यासाठी त्यांनी ड्रीप ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. 23 जूलै रोजी दोन्ही शेतकऱ्यांच्या ऊसात असलेली ठिबक सिंचन ड्रीपचे पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली होती. या घटनेत 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

जिल्हा परिषद निवडणूक 2022 : जामखेड तालुक्यात होणार ‘माधव’ पॅटर्नचे पुनरुज्जीवन? पवार विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा भडकणार

याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गु.र.नं-354/2022 भा.द.वी कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध मिठू महादेव खोसे यांनी 25 जूलै रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार जामखेड पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला होता. आष्टी तालुक्यातील खडकत येथील एकाने सदर चोरी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत 26 जूलै रोजी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरी केलेले शेतातील ड्रिप ठिबकचे पाईप दत्ता रुद्रा काकडे रा. जातेगाव ता.करमाळा, जि सोलापुर यास विकलेले आहेत अशी माहीती आरोपीने दिल्याने जामखेड पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह अटक केली.

जामखेड पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमाल

याप्रकरणी रईस आमिन सय्यद राखङकत ता. आष्टी जि.बीड 2 ) दत्ता रुद्रा काकडे रा. जातेगाव ता.करमाळा,जि सोलापुर या दोन्ही आरोपींना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून गुन्ह्याची उकल केल्याने गिरवली ग्रामस्थांकडून पोलिसांचे आभार मानण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक अजय साठे आणि गुन्हा शोध पथकाने केला.

सदरची कामगिरी पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात पोलिस नाईक अजय साठे,संग्राम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अरूण पवार,संदिप आजबे, संदिप राउत यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करीत आहेत.