Jamkhed Crime News | गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत; जामखेड पोलिसांची कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Crime News | गेल्या दोन वर्षांपासून गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा आरोपींना अटक करण्याची धडक कारवाई जामखेड पोलिसांनी आज केली.(Jamkhed police nabbed two fugitive accused in a serious crime)

जामखेड पोलिसांच्या वतीने आज पहाटे चोभेवाडी व पोतेवाडी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत नितीन चंदन काळे हा फरार आरोपी पोतेवाडी येथून मिळून आला. त्याच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गु. रजि. नं.135/2019 भादवि कलम 395 चा गुन्हा दाखल आहे. तो दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

तर दुसरी कारवाई पोतेवाडी भागात करण्यात आली. या कारवाईत गणेश उर्फ बंडू नामदेव सगळे या फरार आरोपीला अटक करण्यात आली. सगळे याच्याविरोधात गु. रजि. नं. 57/2019 भादवि कलम 354 ,143 ,147 अ. जा.ज.कलम हे गुन्हे दाखल होते.

दोन्ही आरोपी दोन वर्षांपासून फरार होते. या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आज राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही आरोपी मिळून आले. दोघांना पोलिसांनी अटक केली.

कारवाईच्या पथकात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,  पोलीस उप निरीक्षक राजू थोरात, पोलीस अंमलदार अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी ,अरुण पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका धनवडे सह आदींचा समावेश होता.