पारावर.. बांधावर.. हाॅटेलात.. आकडेमोडीला वेग.. कोणाचा विजय ? कोणाचा पराजय? भाजपचा झेंडा फडकणार ? उत्सुकता शिगेला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील रत्नापुर, राजुरी आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी अतिशय चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. मतदानानंतर पॅनल प्रमुख,उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांकडून आकडेमोडीला वेग आला आहे. पारावर.. गावात..हाॅटेलात.. बांधावर बसून नागरिक कोण जिंकणार? कोणाचा पराभव होणार ? यावर चर्चा करताना दिसत आहेत. संपुर्ण तालुक्याला या निकालाची उत्सुकता लागली आहे.

रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुक अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आणि पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जागावाटपात सहमती झाली नाही, त्यामुळे वारे आणि मोरे यांची सहमती एक्स्प्रेस रूळावर धावण्याआधीच घसरली. सुर्यकांत मोरे यांनी आपल्या गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेत राजकीय खळबळ उडवून दिली होती. मोरे आणि वारे यांच्यात मतदानाच्या दिवसापर्यंत दिलजमाई झाली नाही.

दत्तात्रय वारे यांच्या हट्टामुळे नाराज झालेल्या सुर्यकांत मोरे यांनी संपुर्ण निवडणूक प्रक्रियेत गावात पाऊल ठेवले नाही. मोरे थेट मतदानादिवशी सायंकाळी गावात गेले आणि त्यांनी मतदान केले. मोरे यांची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिली. त्यामुळे येथील निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे विरूध्द भाजपाचे युवा कार्यकर्ते अशी थेट लढत झाली. भाजपच्या पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच दादासाहेब वारे आणि पाटोदा सोसायटीचे चेअरमन अशोक महारनवर यांनी केले. रत्नदीपचे अध्यक्ष डाॅ भास्कर मोरे हे या निवडणुकीत फारसे सक्रीय नव्हते.

निवडणुकीआधी राजुरीत पक्षांतराचा बाँम्ब फुटला. त्यामुळे राजुरी ग्रामपंचायत निवडणुक जामखेड तालुक्यात सर्वाधिक गाजली.राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा थेट सामना येथे झाला. परंतू स्थानिक समीकरणे बिघडू नयेत, यासाठी दोन्ही पॅनलकडून बॅनरवर दोन्ही आमदारांचे फोटो टाकणे टाळत चाणाक्ष खेळी खेळण्यात आली. राजुरीत सरपंचपदासाठी भाजपकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई काळदाते विरूध्द राष्ट्रवादीचे सागर कोल्हे याच्या पत्नी अश्विनीताई कोल्हे असा थेट सामना रंगला होता.येथील निवडणुक यंदा अतिशय चुरशीची ठरली. येथील निकाल काय लागतो याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष आहे.

शिऊरमध्ये बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपा नेते गौत्तम उत्तेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. उत्तेकर यांच्या पत्नी सरपंचपदासाठी मैदानात उतरल्या होत्या. शिऊरमध्ये भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा सामना झाला.

भाजपचा झेंडा फडकणार ?

राजुरी, रत्नापुर आणि शिऊर या तीन ग्रामपंचायतीत काय निकाल लागणार याची संपुर्ण जामखेड तालुक्याला उत्सुकता आहे. मतदानादिवशी जनतेचा दिसलेला कौल आणि त्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीच्या अंदाजावरून भाजपचे सरपंचपदाचे तीनही उमेदवार थोड्या फरकाने विजयी होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे. परंतू तीनही गावात मतदानाचा टक्का वाढला आहे. हा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे मात्र मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे

दरम्यान सदस्यपदाच्या मतदानात क्रोस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याचा काहीसा फायदा राष्ट्रवादीला होईल, पण राष्ट्रवादीला बहुमताचा जादुई आकडा हुलकावणी देईल, असाही अंदाज राजकीय विश्लेषक करताना दिसत आहेत. दरम्यान, मतमोजणीनंतर समोर येणारे खरे चित्र धक्कादायक निकालाची नोंद करणारे ठरणार का ? याकडेही जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतमध्ये प्रभागनिहाय झालेले मतदान खालीलप्रमाणे

राजुरी ग्रामपंचायत निवडणूक
प्रभाग एक
एकुण मतदान : 902 (महिला 408 + पुरुष 494 )
झालेले मतदान : 721 ( महिला 317 + पुरूष 404)

प्रभाग दोन
एकुण मतदान : 491  (महिला 216 + पुरुष 275 )
झालेले मतदान : 432  ( महिला 193  + पुरूष 239 )

प्रभाग तीन
एकुण मतदान : 724  (महिला 342 + पुरुष 382 )
झालेले मतदान : 590  ( महिला 267 + पुरूष 323 )

राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2117 (महिला 966 + पुरुष 1151 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 1743 ( महिला 777 + पुरुष 966 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान खालील प्रमाणे

प्रभाग एक
एकुण मतदान : 539  (महिला 268 + पुरुष 271)
झालेले मतदान : 477 ( महिला 230 + पुरूष 247 )

प्रभाग दोन
एकुण मतदान : 753 (महिला 372 + पुरुष 381 )
झालेले मतदान : 646  ( महिला 314  + पुरूष 332 )

प्रभाग तीन
एकुण मतदान :  780 (महिला 370 + पुरुष 410 )
झालेले मतदान : 663 ( महिला 296 + पुरूष 367 )

रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2072 (महिला 1010 + पुरुष 1062 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 1786 ( महिला 840 + पुरुष 946 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय मतदान खालील प्रमाणे

प्रभाग एक
एकुण मतदान : 1027  (महिला 481 + पुरुष 546 )
झालेले मतदान : 849 ( महिला 390 + पुरूष 459)

प्रभाग दोन
एकुण मतदान : 746 (महिला 345 + पुरुष 401)
झालेले मतदान : 585 (महिला 260 + पुरूष 325 )

प्रभाग तीन
एकुण मतदान : 788 (महिला 352 + पुरुष 436)
झालेले मतदान : 675 ( महिला 297 + पुरूष 378 )

शिऊर ग्रामपंचायत निवडणुकीत एकुण 2571 (महिला 1178 + पुरुष 1383 ) मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 2109 ( महिला 947 + पुरुष 1162 ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.