जवळा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडी बिनविरोध

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी बुधवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शहाजी पाटील यांची चेअरमनपदी तर शिवाजी कोल्हे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

जामखेड तालुक्याच्या सहकाराच्या राजकारणात जवळा सोसायटीला मोठे महत्व प्राप्त आहे. यंदा सोसायटीवर कोणाचा कब्जा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यंदाच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरूध्द शेतकरी ग्रामविकास पॅनल अशी थेट लढत झाली.

शेतकरी विकास आघाडीने शेतकरी ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडवत सोसायटीवर कब्जा मिळवला. या निवडणुकीत आरोप – प्रत्यारोपांचा सामना जोरदार रंगला होता. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत स्थापलेल्या शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून सोसायटीवर सत्ता काबीज केली.

निकालानंतर बुधवारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणुक पार पडली. चेअरमनपदासाठी शहाजी पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी शिवाजी कोल्हे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक देविदास घोडेचोर व मुंडे यांनी काम पाहिले, संस्थेचे सचिव सुरेश लेकुरवाळे यांनी सहकार्य केले.

यावेळी जवळा संस्थेचे संचालक नवनाथ पोपट बारस्कर, राजेंद्र रामचंद्र हजारे, अविनाश काकासाहेब लेकुरवाळे, काशिनाथ गहिनीनाथ मते, चंद्रहार किसन पागिरे,अरूण नामदेव रोडे, कैलास महादेव वाळुंजकर, शहाजी संभाजी पाटील (वाळुंजकर), आयोध्या रामलिंग हजारे, सायरा सत्तार शेख, शिवाजी तुकाराम कोल्हे, मच्छिंद्र मारूती सुळ, रूपचंद तुकाराम अव्हाड उपस्थित होते.

चेअरमनपदी शहाजी पाटील व व्हाईस चेअरमनपदी शिवाजी कोल्हे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच शेतकरी विकास आघाडीच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. निवडीनंतर दोन्ही पदाधिकारी आणि नवनिर्वाचित संचालकांचा शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी जंगी सत्कार केला.

यावेळी शेतकरी विकास आघाडीचे पॅनल प्रमुख दत्तात्रय कोल्हे, माजी सभापती दिपक पाटील, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, दशरथ हजारे गुरूजी, संतराम सुळ, राजेंद्र राऊत, डाॅ.महादेव पवार, डाॅ.दिपक वाळुंजकर, राजेंद्र मोटे,अनिल पाटील, प्रदीप दळवी, प्रशांत पाटील, केशव हजारे चेअरमन, राजेंद्र राऊत, सोपान बोराटे, गौतम कोल्हे, एकनाथ हजारे, महेंद्र खेत्रे, बाबा महारनवर, संजय आव्हाड, अशोक पठाडे, किरण हजारे, राजेंद्र महाजन, अभय नाळे, किरण वर्पे, अयुबभाई शेख, प्रविण लेकुरवाळे, नय्युम शेख, किरण रोडे, सतीश हजारे, रंगनाथ ठोंबरे बबन ठकाण, महेंद्र खेत्रे, पुरुषोत्तम वाळूंजकर, राजाराम सुळ, एकनाथ हजारे, नवनाथ कोल्हे, रामलिंग हजारे, बाबा महारनवर, कानिफ मते सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी होणार नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

जवळा सोसायटीच्या सर्वच संचालकांना सत्तेची समान संधी मिळावी यासाठी प्रत्येक वर्षी नवे पदाधिकारी (चेअरमन/व्हाईस चेअरमन) निवडीचा निर्णय शेतकरी विकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. काही संचालक पहिल्यांदा आम्हाला संधी द्यावी यासाठी आग्रही होते, परंतू त्यांची नाराजी दूर करत एकमताने दरवर्षी नवे पदाधिकारी निवडण्यावर बैठकीत फैसला घेण्यात आला.

Video : पदाधिकारी निवडीनंतर शेतकरी विकास आघाडीचे नेते काय म्हणाले ? पहा ⤵️