- Advertisement -

धक्कादायक: जामखेड तालुक्यातील ‘या’ गावात आढळले काळवीट मृतावस्थेत!(Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील सारोळा शिवारातील एका विहीरीच्या पाण्यात आज मंगळवारी  मृतअवस्थेतील काळवीट आढळून आले. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काळवीटाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा कसून शोध घेेेण्याची आवश्यकता आहे. (Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)

Shocking, Antelope found dead,  Sarola village of Jamkhed taluka, jamkhed Times,jamkhed news,jamkhed live, Forest department

सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील सारोळा शिवारातील बापु कोल्हे यांच्या विहीरीतील पाण्यात मृत काळवीट तरंगत असल्याचे अशोक ढोले यांच्या निदर्शनास मंगळवारी आले. याबाबतची माहिती त्यांनी सारोळ्याचे पोलिस पाटील सिध्देश्वर पवार यांना कळवली. सदर घटनेची माहिती पोलिस पाटील पवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड यांना कळवली. (Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड यांनी तातडीने जामखेड वनविभागाच्या अधिकार्यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार वनरक्षक पवार व वनमजुर ताहेर अली सय्यद, शामराव डोंगरे भोगल यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता. काळवीट विहीरीच्या पाण्यात मृतावस्थेत तरंगताना आढळून आले. यावेळी वनविभागाच्या कर्मचार्यांनी सदर मृत काळवीटाला दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ मृत काळवीटाचा पंचनामा करत शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाने मृत काळवीटावर अंत्यसंस्कार केले. (Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)

दरम्यान सदर काळवीटाचा मृत्यू पाण्याच्या शोधासाठी झाला की हिंस्त्र प्राण्याच्या तावडीतून वाचण्यासाठी पळताना विहीरीत पडल्याने झाला याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. परंतू सदर काळवीट हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यापासून पळताना विहीरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज वनमजुर ताहेरअली सय्यद यांनी वर्तवला आहे.(Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)

जामखेड तालुक्यात हरणांसह काळवीटांची मोठी संख्या आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याच्या शोधासाठी जंगली प्राणी शिवारभर भटकत असल्याचे चित्र आहे. जंगली पशु पक्ष्यांसाठी तातडीने वनविभागाने पाणवठ्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. अन्यथा वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वनप्राण्यांना जीवाला मुकण्याची वेळ येऊ शकते. यामुळे वनविभागाने तातडीने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. (Shocking: Antelope found dead in village of Jamkhed taluka)