Sant Vamanbhau Maharaj Punyatithi 2025 : बुधवारपासून जामखेड तालुक्यातील जमादारवाडीत रंगणार भक्ती सोहळा, संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sant Vamanbhau Maharaj Punyatithi 2025 : संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जामखेड शहराजवळील संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाच्या सप्ताहाची सुरुवात २२ जानेवारी २०२५ पासून होणार आहे.

Sant Vamanbhau Maharaj Punyatithi 2025, On the occasion of Saint Vamanbhau Maharaj Punyatithi, Akhand Harinam saptah will be organized, daily devotional ceremony will be held in jamkhed's Jamadarwadi  from Wednesday,

बुधवारी सकाळी संत वामनभाऊ महाराज, गहिनीनाथ महाराज व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीची महापूजा होऊन नऊ वाजता पुण्यतिथी निमित्त भजन सुरू होईल. सकाळी ११.४५ वाजता पुष्पवृष्टी होऊन संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होईल.

असा असेल अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम

अखंड हरिनाम सप्ताहात बुधवारी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन तर सात ते नऊ या वेळेत दत्तात्रय महाराज खवळे सारोळा यांचे कीर्तन होईल.

गुरुवारी नारायण महाराज काळे यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ शिवानंद महाराज श्रीक्षेत्र हनुमान टेकडी यांचे कीर्तन होईल.

शुक्रवारी अंगद महाराज ढोले यांचे प्रवचन तर सायंकाळी सात ते नऊ शिवचरित्रकार गणेश महाराज बर्डे बोधेगाव यांचे कीर्तन होईल.

शनिवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर सायंकाळी योगीराज महाराज पवार शास्त्री तिळापूर यांचे कीर्तन होईल.

रविवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन व शिवचरित्रकार अशोक महाराज आजबे बीड यांचे कीर्तन होईल.

सोमवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी स्वामी शांतानंद सरस्वती महाराज पंढरपूर यांचे कीर्तन होईल.

मंगळवारी रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा व सायंकाळी ९ ते ११ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन होईल.

बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर हरिजागर.किर्तन संपल्यानंतर दररोज आलेल्या सर्व श्रोत्यांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे.

तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या संपूर्ण उत्सवाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.