जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक,निम्मा तालुका निघाला कोरोनाबाधित

रविवारी दिवसभरात आढळले १७८ नवे कोरोनाबाधित

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने चढ उतार सुरू आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विळखा आता अधिकच घट्ट होऊ लागला आहे. रविवारी कोरोनाने आजवरचा सर्वात मोठा दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक रूग्णसंख्या रविवारी जामखेड तालुक्यात नोंदवली गेली आहे. रविवारी कोरोनाचे तब्बल १७८ नवे रूग्ण आढळून आल्याने तालुका हादरून गेला आहे.

रविवारी जामखेड तालुक्यात आरोग्य विभागाने दिवसभरात ६३१ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४१८ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. रविवारी सर्वाधिक तडाखा जामखेड शहराला बसला आहे. रविवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता अर्धा तालुका कोरोनाने आपल्या विळख्यात अडकवला आहे हे आता स्पष्ट झाले आहे. जवळपास इतक्या गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाचा महाविध्वंस सुरू झाल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

रविवारी आरोग्य विभागाने जामखेड तालुक्यात केलेल्या ६३१ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड ०५, रत्नापुर ०१, साकत ०१, भुतवडा ०२, कुसडगाव ०१, नागोबाची वाडी ०२, शिऊर ०४ असे १६ रूग्ण आढळून आले आहेत.

प्रशासनाला रविवारी १५९० RTPCR कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये जामखेड तालुक्यात आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहर ३८, फक्राबाद १६, धोतरी ०३, मतेवाडी ०१, बावी ०२, शिऊर ०३, साकत ०६, सोनेगाव ०१, कुसडगाव ०३, तेलंगशी ०५, नान्नज ०२, गीतेवाडी ०२, बसरवाडी ०१, रत्नापुर ०५, बोरला ०२, जवळके ०३, डोळेवाडी ०१, भुतवडा ०९, नाहूली ०१, जवळा ०७, खर्डा ०६, बटेवाडी ०१, वंजारवाडी ०६, मोहा ०३, नायगाव ०३, झिक्री ०१, बांधखडक ०४, हापटेवाडी ०३, आनंददायी ०१, रेडेवाडी ०१, भोगलवाडी ०१, मोहरी ०२, धामणगाव ०३, चौंडी ०४, हळगाव ०१, नागोबाचीवाडी ०१, पिंपळगाव उंडा ०१, खर्डा ०२, सावरगाव ०१ असे १५८ तर इतर तालुक्यातील ०४ असे मिळून १६२ नवे कोरोनाबाधित आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यात रविवारी दिवस अखेर एकुण १७८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. मागील चार दिवसांचे RTPCR तपासणी अहवाल आज प्राप्त झाल्याने एकाच दिवसांतील रूग्णांची आकडेवारी वाढली गेली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा जामखेड तालुक्यात अधिक घट्ट होत आहे. रोजची वाढती रूग्णसंख्या आता स्पष्टपणे तिसरी लाट सक्रीय होऊ लागल्याचे संकेत देऊ लागली आहे.

नागरिकांनो दुसर्‍या लाटेचा विध्वंस इतक्या लवकर विसरून जर आपण हाराकिरी करणार असु तर तिसऱ्या लाटेच्या विध्वंसांपासुन आपल्याला कोण वाचवणार ? याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.