coronavirus jamkhed daily news | जामखेड तालुक्यात मंगळवारी दिवसभरात आढळले 45 नवे कोरोनाबाधित

जामखेड तालुका कोणत्याही क्षणी  रेड अ‌ॅलर्ट वर जाऊ शकतो अशी चिन्हे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : coronavirus jamkhed daily news | जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोरोनाने सोमवारी काहीसा दिलासा दिला होता. मात्र मंगळवारी कोरोना पुन्हा सुसाट झाला आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जामखेड तालुका कोणत्याही क्षणी  रेड अ‌ॅलर्ट वर जाऊ शकतो अशी चिन्हे दिसु लागली आहेत. (corona patients in jamkhed ahmednagar district today)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : coronavirus jamkhed daily news | मंगळवार दि २७ जुलै रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने दिवसभरात ७८२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४९३ नागरिकांचे स्वॅबनमुने RTPCR कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (corona patients in jamkhed ahmednagar district today) 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : coronavirus jamkhed daily news | सोमवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये जामखेड  ०२, वाघा ०२, रत्नापुर ०३, शिऊर ०२, भुतवडा ०१, धोंडपारगाव ०१, मोहा ०१‌ फक्राबाद ०१, जवळा ०२ या १५ रूग्णांचा समावेश आहे. तर RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड ०६, सातेफळ ०१, कवडगाव ०१, फक्राबाद ०२, वंजारवाडी ०१, खामगाव ०१, खर्डा ०२, साकत ०१, भोगलवाडी ०१, तेलंगशी ०२, रत्नापुर ०१, सावरगाव ०१, नान्नज ०१, पिंपळगाव उंडा ०१, जायभायवाडी ०१, जवळा ०२, वाघा ०१ या २६ तर  इतर तालुक्यातील ०४ अश्या ३० रूग्णांचा समावेश आहे. (corona patients in jamkhed ahmednagar district today) 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : coronavirus jamkhed daily news | जामखेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने चढ उतार सुरू आहे. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विळखा आता अधिकच घट्ट होऊ लागला आहे. (corona patients in jamkhed ahmednagar district today) 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : coronavirus jamkhed daily news | जामखेड तालुक्यात सर्वच समाज घटकांचे लग्नसोहळे जोरात सुरू आहेत. जनतेची गर्दी या सोहळ्यांमध्ये मोठी आहे. यासह विविध सण व विविध धार्मिक कार्यक्रम, समारंभ दणक्यात साजरे होत आहेत. राजकीय कार्यक्रमही तुफान गर्दी खेचत आहेत. भरीस भर म्हणून बाजारपेठेतील गर्दी तर वेगळीच होत आहे. याचा अर्थ आपण सर्वच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विध्वंस विसरून पुढे निघुन गेलो आहोत याचे दर्शन रोज घडत आहे.वेळीच सावध न झाल्यास जामखेड तालुक्याला पुन्हा तिसऱ्या लाटेचा मोठा दणका बसेल हे मात्र निश्चित! (corona patients in jamkhed ahmednagar district today)