आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून चौंडी – डोणगाव रस्त्याचे भाग्य उजळले

सुमारे ०१ कोटी ३५ लाख रूपये खर्चून होणार चौंडी ते डोणगाव रस्ता

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील चौंडी – गिरवली – कवडगाव – अरणगाव – पारेवाडी – डोणगाव या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते २५ रोजी भूमिपूजन अरणगाव येथे पार पडले.गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावी अशी या भागातील जनतेची मागणी अखेर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून पूर्णत्वास आली आहे.सुमारे ०१ कोटी ३५ लाख रूपये खर्चून चौंडी ते डोणगाव हा रस्ता होणार आहे.यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्थानिक ग्रामस्थांना व कार्यकर्त्यांना रस्ता भूमिपूजन कामाचा नारळ फोडणे व कुदळ मारण्याचा मान दिला.

यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कांबळे, शाखा अभियंता शशिकांत सुतार, बाबूराव महाडिक, शांतीलाल लाड ठेकेदार तोरडमल, राष्ट्रवादीचे नेते प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, पांडुरंग सोले पाटील, संतोष निगुडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकर गदादे, नागेश गवळी, बाळासाहेब पारे, नवनाथ ससाणे, किशोर ससाणे, सिताराम कांबळे, नाना भोरे सह आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत – जामखेड मतदारसंघात दळणवळणाचे जाळे मजबुत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार,  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व इतर मंत्र्यांच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याचे यावेळी आमदार पवार म्हणाले.