20 crore fund came to Jamkhed taluka | लयभारी : जामखेडमध्ये रोहित पवारांची जादूची कांडी लागली फिरू !

जामखेड तालुक्यात आला 20 कोटींचा निधी !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : 20 crore fund came to Jamkhed taluka | आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी मंत्रालय स्तरावर सादर केलेल्या विविध विकास कामांच्या आराखड्यांना आता भरीव  निधी मिळू लागला आहे.

आमदार रोहित पवार यांची जादूची कांडी मतदारसंघात फिरू लागली असुन जामखेड तालुक्यात तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त निधीच्या कामांना बुधवारी दणक्यात प्रारंभ झाला आहे. यामुळे आता जामखेड तालुक्यात विकासाचा नवा झंझावात जोरदारपणे धावू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

20 crore fund came to Jamkhed taluka
जामखेड तालूक्यातील अरणगाव येथे रस्ता कामाचे भूमिपूजन करताना आमदार रोहित पवार सह आदी मान्यवर.

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते तेलंगशी, देवदैठण,  बांधखडक, जवळा, बावी, अरणगाव, खुरदैठण, धोंडपारगाव, बऱ्हाणपूर, चोभेवाडी या ठिकाणी रस्त्यांची भूमिपुजने पार पडली तर फक्राबादमध्ये आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.  या सर्व कामांसाठी अंदाजे 20 कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झाला आहे. (20 crore fund came to Jamkhed taluka)या कामांमुळे ग्रामिण भागातील रस्ते मजबूत होऊन दळणवळणाच्या सुविधा गतिमान होण्यास मदत होणार आहे. जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून विकास कामांचा नवा झंझावात धावू लागल्याने मतदारसंघातील जनतेत आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (20 crore fund came to Jamkhed taluka)

20 crore fund came to Jamkhed taluka
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या कामांचे करण्यात आले भूमिपूजन

बुधवारी दिवसभरात आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत सभापती सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, विजयसिंह गोलेकर, युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे,फाक्रबादचे  सरपंच विश्वनाथ राऊत, पांडुरंग सोले, संतोष निगुडे, शंकरशेठ गदादे, बाळासाहेब पारे या पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय कांबळे, शाखा अभियंता शशिकांत सुतार, बाबूराव महाडिक व शांतीलाल लाड हे अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध कामांसाठी नेमण्यात आलेले सर्व ठेकादार उपस्थित होते.