अन् सेवानिवृत्त भूमिपुत्र भारावून गेले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा। 6 जानेवारी । अनेक वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होऊन गावी परतलेल्या भूमिपुत्रांचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने सेवानिवृत्त भूमिपुत्र भारावून गेले होते. खर्डा येथे हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात सेवानिवृत्त बजावताना आलेले अनुभव सर्वांनीच कथन केले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे परिसरातील सेवानिवृत्त भूमिपुत्रांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिक व मुख्याध्यापक यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक अभिमान गोपाळघरे, सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब गोपाळघरे, बलराम गोपाळघरे, अशोक मुंडे, बाळासाहेब जाधव, रावसाहेब जाधव, हनुमंत बारगजे, आसाराम गोपाळघरे या सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सैनिकांचा सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.ज्या मातीत जन्म झाला त्या मातीने केलेल्या सन्मानाने सर्वच भूमिपुत्र भारावून गेले होते.

यावेळी सभापती सूर्यकांत मोरे, जामखेड तालुका राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे, डॉ अंकुश गोपाळघरे, डॉ.राजेंद्र नागरगोजे, प्रा आदिनाथ खेडकर, अमोल जायभाय, प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर कौले, परशुराम देशमुख, रवी पवार ,बाळासाहेब बर्डे, बबन बारगजे, विकास सौने यांच्यासह जय भगवान युवा मंच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक परशुराम देशमुख प्रस्ताविक तुळशीदास गोपाळघरे व आभार विकास सौने यांनी व्यक्त केले.