अजय (दादा) काशिद यांच्या नेतृत्वाखाली सारोळा सोसायटी बिनविरोध

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय दादा काशिद यांच्या नेतृत्वाखाली सारोळा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.

जामखेड तालुक्यात सारोळा हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे गाव आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष असलेले अजय दादा काशिद हे सारोळा गावचे सरपंच आहेत. काशिद यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी सोसायटी निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

सारोळा गावातील नव्या जुन्यांचा मेळ घालून मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अजय दादा काशिद यांनी याही वर्षी सारोळा सोसायटी निवडणुक बिनविरोध केली. सारोळा गावाने तालुक्यासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

बिनविरोध उमेदवार खालील प्रमाणे

 1. सातपुते भीमराव माणिक
 2. काशीद मकरंद मोहनराव
 3. जगदाळे बाबासाहेब भानुदास
 4. मुळे बजरंग भगवान
 5. काशीद अरुण लक्ष्मण
 6. हगवणे बजरंग शंकरराव
 7. पवार भगवान महादेव
 8. महारनवर माया सुरेश
 9. बहिर दत्तात्रय बापूराव
 10. मुळे सुनीता रमेश
 11. आजबे कांताबाई पांडुरंग
 12. काशीद रघुनाथ दत्तात्रय
 13. मुळे अशोक तुकाराम

सारोळा सोसायटी बिनविरोध करण्यासाठी रामदास मुळे, हिंदुराज मुळे, किरण मुळे, अंगद सांगळे, राजेंद्र मासाळ, अरविंद मुळे, हर्षद मुळे, आप्पासाहेब ढगे सह आदींनी सहकार्य केले.