Corona Century | दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्याने तालुक्यात उडाली मोठी खळबळ
कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच कोरोना झाला सुसाट
[bs-quote quote=”जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच जामखेड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांत कोरोनाने शतक झळकावल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.शनिवारीही कोरोना सुसाट झाला आहे.Corona century in two days caused a stir in the taluka” style=”style-7″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]
[bs-quote quote=”जामखेड तालुक्याला कोरोनाने मागील दोन दिवसांत सर्वात मोठा दणका दिला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत तब्बल ८७ रूग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात कोरोनाचा विध्वंस सुरू तर झाला नाही ना या चिंतेने आता जनतेला ग्रासले आहे. Corona century in two days caused a stir in the taluka” style=”style-5″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]
[bs-quote quote=”आज शनिवारी आरोग्य विभागाने ६९८ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यां केल्या त्यामध्ये जामखेड ०४, वाघा ०४, भुतवडा ०२, नान्नज ०१ , बोरला ०१, धोतरी ०१, तेलंगशी ०१, फक्राबाद ०४ असे तर RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०१ असे एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. आज आरोग्य विभागाने ४५२ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने जिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणीसाठी पाठवले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली. Corona century in two days caused a stir in the taluka” style=”style-5″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]
[bs-quote quote=”शुक्रवारी दिवसभरात ६०४ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जामखेड ०५, वाघा ०२, राजुरी ०१, भुतवडा ०३, धोतरी ०३, घोडेगाव ०२ असे १६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR कोरोना तपासणी अहवालात जामखेड २०, तेलंगशी २८, दौंडवाडी ०१, बांधखडक ०१, भुतवडा ०१, बोरला ०४, डिसलेवाडी ०१, हापटेवाडी ०१, जमदारवाडी ०२, खर्डा ०१, कुसडगाव ०१, महारूळी ०१, साकत ०१, शिऊर ०३, सोनेगाव ०१, सावरगाव ०१, पिंपरखेड ०२, रत्नापुर ०१ असे एकुण ८७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर ४५७ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले होते. Corona century in two days caused a stir in the taluka” style=”style-5″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]