Political discussion | प्रविण घुलेंच्या बैठकीच्या परिसरात राम शिंदेंची एन्ट्री  : दोन्ही नेत्यांची पुन्हा बैठक ; राजकीय चर्चांना आला जोर ! !

शिंदे-घुलेंच्या "कॉफीची" चर्चा जिल्ह्यात चर्चेला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  Political discussion | सध्या कर्जत (karjat) तालुका राज्याच्या राजकारणात भलताच चर्चेत आला आहे. कर्जतमधल्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.पक्षांतराचे वादळ (storm) कर्जतमध्ये सक्रीय आहे.अश्यातच शनिवारची सायंकाळ एका राजकीय घडामोडीमुळे भलतीच चर्चेत आली आहे. कारण दोन पक्षातील दिग्गज नेत्यांची झालेली भेट.

25 सप्टेंबर.. वार शनिवार.. वेळ संध्याकाळी 04:55 वाजताची… राज्याचे माजी मंत्री राम शिंदे हे कर्जतच्या दौऱ्यावर होते.. हा दौरा सुरू असतानाच त्यांचा ताफा लोहारगल्ली परिसरात थांबला.. तसं पाहता हा परिसर कर्जतकरांसाठी विशेष परिचित असा आहे. कारण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दादा घुले (Pravin Ghule) यांची नियमित बैठक याच भागात असते. घुलेंच्या बैठकीच्या परिसरात राम शिंदेंची (Ram Shinde) एन्ट्री होताच अनेकांच्या भूवया उंचावल्या.

राम शिंदेंचा ताफा लोहारगल्ली परिसरात येताच प्रवीण घुलेंनी राम शिंदेंना कॉफी पिण्याचे आमंत्रण दिले.शिंदेंनीही आमंत्रण स्वीकारले. दोन्ही नेत्यांची बैठक बसली. दहा मिनिटांत काॅफीही आली. मात्र या खुल्या बैठकीची वार्ता शहरभर पसरली. सोशल मिडीयावर या बैठकीचे फोटो वायरल होताच कर्जतच्या राजकारणात प्रविण घुले आणि माजी मंत्री राम शिंदे  यांच्या “एक प्याला कॉफीची” जोरदार राजकीय चर्चा रंगली होती. Political discussion

सध्या भाजपातून मोठ्या प्रमाणात आऊट गोइंग सुरू आहे. मात्र माजी मंत्री राम शिंदे अजून शांत आणि संयमी भूमिका दाखवून आहेत. शिंदे यांनी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांच्याशी चर्चा करण्याचा धडाका लावला आहे. शहरातील लोकांच्या गाठी-भेटी घेत आपला जनसंपर्क (Public relations) वाढविण्यावर भर देताना राम शिंदे दिसु लागले आहेत.

कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत नुकताच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत (NCP) आपला अधिकृत प्रवेश केला. राम शिंदे यांनी यावर अजून आपली प्रतिक्रिया (commente) व्यक्त केलेली नाही.

शनिवार, दि २५ रोजी राम शिंदे कर्जत शहरात फेरफटका मारत असताना अचानक त्यांची गाडी लोहारगल्ली या ठिकाणी थांबली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांची या ठिकाणी कायम बैठक असते. यावेळी दोघांनी एकमेकांना नमस्कार करीत बैठक मारली. घुले यांनी तात्काळ शिंदे यांना चहा अथवा कॉफी (Coffee) घेण्याचे आमंत्रण दिले. शिंदे यांनी एक कप कॉफीच घेऊ असे म्हणत आमंत्रण स्वीकारले. अवघ्या दहाच मिनिटात कॉफी आली. माजी मंत्री शिंदे आणि जिल्हा उपाध्यक्ष घुले यांनी कॉफी घेत असतानाच तो पर्यंत “शिंदे-घुलेच्या कॉफीची चर्चा” अख्या शहरात वाऱ्यासारखी पसरली.

बघता-बघता अनेकांनी घुले आणि शिंदेंची ती एक कप कॉफी आपल्या डोळ्यात देखील कैद केली. कॉफी घेत असताना दोघांमध्ये काय राजकीय चर्चा घडली ? हे मात्र समजले नाही. मात्र त्या कॉफीने कर्जतच्या स्थानिक राजकारणात धुराळा उडवला हे मात्र निश्चित.

एकाच महिन्यात शिंदे –  घुले यांची दुसरी बैठक

याच महिन्यात उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी माजीमंत्री राम शिंदे, खा सुजय विखे (MP Sujay Vikhe) माजी मंत्री शिवाजी कर्डीले आणि प्रवीण घुले यांची राजकीय मैफिल तब्बल एक तास रंगली होती. त्यानंतर शिंदे  पुन्हा शिंदे व घुले यांची भेट झाली.  दोन्ही नेत्यांची ही महिन्यातील दुसरी भेट आहे.ही भेट निव्वळ योगा-योग की अगामी काळात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी ? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत हे मात्र खरं..!

डाॅ अफरोज पठाण (कर्जत प्रतिनिधी)

न्यूज एडिट by सत्तार शेख

web title : Political discussion | the-meeting-between-ram-shinde-and-pravin-ghule-came-up-again-in-the-discussion