ठरलं ! राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत शिवसेना ‘या’ उमेदवाराला साथ देणार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (president election 2022) NDAच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विरुध्द माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) असा सामना होणार आहे. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे. NDA चे घटक पक्ष नसलेले पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना (shiv sena) काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या कोणत्या उमेदवारा मतदान करायचे यावर चर्चा झाली. या बैठकीत काय ठरलं याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांच्या दबावमुळे अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (draupadi murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.पण, आम्ही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणजे, भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुगली टाकली.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीबद्दल खुलासा केला आहे. शिवसेना ही नेहमी शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेश पाळले जात असतात.शिवसेनेत बैठक झाली. यावेळी खासदारांची मतं जाणून घेतली. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली.

द्रोपर्दी मुर्मू या आदिवासी आहे.त्या पहिल्या राष्ट्रपती होणार आहे. या संदर्भात काय निर्णय घ्यावा अशी चर्चा झाली. द्रोपर्दी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

‘यशवंत सिन्हा हे विरोधीपक्षाचे उमेदवार आहे. त्यांच्याबद्दलही आमच्या सद्भावना आहे. विरोधी पक्ष टिकावा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एक लोकभावना काय आहे, हे जाणून निर्णय घेतला आहे. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई या महाराष्ट्राच्या राष्ट्रपती होत्या. प्रणव मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेना ही एनडीएमध्ये होती, असंही राऊत यांनी सांगितलं.

‘राष्ट्रपतिपदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचा आहे, याबद्दल उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय घेतील. पक्षप्रमुख कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. ते एक दोन दिवसांमध्ये निर्णय जाहीर करतील’ असंही राऊतांनी सांगितलं.

‘सोमवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला बहुसंख्य खासदार उपस्थितीत होते.यावेळी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे गैरहजर होते. त्याला आम्ही काही करू शकत नाही. भावना गवळी गैरहजर होत्या, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

‘ही बैठक 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत चालू होती.बैठक संपल्यानंतर मी सामनाच्या कार्यालयात गेलो होतो. मला अन्य कामं होती. मी कामं कधी थांबवत नाही. माझ्याबद्दल ज्या लोकांनी बातम्या दिल्यात ती मुर्ख लोक आहे.त्यांना कळत नाही, नेमकं काय चाललं आहे. अशा अफवा पसरवणे, खोट्या बातम्या पोहोचवण्याचे काम करण्यासाठी यंत्रणा सुरू आहे, असा संतापही राऊतांनी व्यक्त केला.

‘मी ट्वीट केलं, आता कळेल भविष्यामध्ये कुणाला कुणामुळे खतरा आहे. आम्हाला कुणामुळेही धोका नाही. ठीक आहे, जे व्हायचं ते होऊन गेलं आहे.पण भविष्यामध्ये कुणी कोणाला राजकारणामध्ये सुरक्षित समजू नये, सगळ्यांच्या हातामध्ये खंजीर आहे. प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.