आरपीआय आठवले गटाची जामखेड तालुका कार्यकारणी जाहीर, तालुकाध्यक्षपदी शिंदे यांची निवड !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । अगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका डोळ्यासमोर ठेवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) पक्षाने पक्ष संघटना मजबूत करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या वतीने जामखेडमध्ये चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावागावात पक्ष संघटना मजबूत करण्याची रणनिती ठरवण्यात आली. ही बैठक पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या जामखेड तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच जामखेडमध्ये संपन्न झाली. या बैठकीत नव्याने तालुकाध्यक्षाची निवड करण्यात आली. बाळासाहेब शिंदे यांना तिसऱ्यांदा तालुकाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष पै. विवेक भिंगारदेवे,नगरसेवक राहुल कांबळे, नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष धरम घायतडक,महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आशाताई पवार, आदिवासी पारधी आघाडी महिला जिल्हाध्यक्ष पार्वती ताई भोसले, श्याम भोसले , जिल्हा नेते गोरख सुर्यवंशी, रिपब्लिकन फेसबुक पेजचे संस्थापक महेंद्र निकाळजे यांच्या हस्ते नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आरपीआय आठवले गटाची निवडण्यात आलेली जामखेड तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे

1) जामखेड तालुका अध्यक्ष – बाळासाहेब शिंदे
2) युवक तालुकाध्यक्ष –  देविदास साळवे
3) तालुका उपाध्यक्ष – सुजित धनवे
4) तालुका सचिव – अंकुश गायकवाड
5) रिपाई महिला तालुकाध्यक्ष – रुक्साना पठाण
6) रिपाई घिसाडी समाज तालुकाध्यक्ष – कैलास चव्‍हाण
7) रिपाई मुस्लीम आघाडी तालुकाध्यक्ष  -आदम (बब्बु) अब्दुल अजीज शेख,
8) पंचायत समिती गण प्रमुख –  काशिनाथ सदाफुले, बबन सदाफुले

9) जामखेड तालुका चिटणीस – खंडूजी तुकाराम मोरे, बापू जावळे
10) तालुका कार्याध्यक्ष – सतीश साळवे
11) सहचिटणीस किरण भानुदास मोरे,
12) तालुका उपाध्यक्ष –  राम साळवे
13)  युवक उपाध्यक्ष – चक्रधर शिरसाठ
14) जामखेड तालुका महिला कार्याध्यक्ष – सुवर्णा हनुमंत शिरसागर
15) जामखेड तालुका प्रसिद्धीप्रमुख हनुमान अंकुश गायकवाड,

16) सातेफळ शाखाध्यक्ष –  आकाश प्रकाश सदाफुले
17) खर्डा शहर – उपाध्यक्ष मिलिंद साळवे