कर्जत – जामखेडमधील 151 महिला बचतगटांना रोहित पवारांच्या हस्ते दीड कोटींच्या कर्जाचे वाटप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील 151 बचतगटांना 1 कोटी 50 लाख रूपयांच्या कर्जाचे वाटप आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खादी व ग्रामोद्योगव कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेतर्फे 70 महिलांना पायाने चालवता येणाऱ्या अगरबत्ती बनवण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले. मशीन्सबरोबरच प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार व सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून जामखेडमध्ये तीन दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी बचतगटांच्या महिलांना उपयुक्त असणाऱ्या मशिनरीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी बचत गटातील महिलांना आमदार रोहित पवार व त्यांच्या आई सुनंदाताई पवार यांच्या हस्ते कर्जाचे वाटप करण्यात आले कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमांतून हे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचबरोबर अगरबत्ती बनवण्याचे मशीनचेही वाटप करण्यात आले.

महिलादिनी कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 31 महिलांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे.