Panchayat Samiti by-elections Congress has the highest number of seats | पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने मारली जोरदार मुसंडी

Panchayat Samiti by-elections, Congress has the highest number of seats

Panchayat Samiti by-elections Congress has the highest number of seats | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यातील पंचायत समित्यांच्या 144 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र समोर आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली गेल्याचं पाहायला मिळत आहे. (Panchayat Samiti by-elections Congress has the highest number of seats)

पंचायत समिती निवडणुकांचे कल हाती आल्यानंतर काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. या निकालावर प्रतिक्रिया देताना काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. पटोले पुढे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्त एक चांगली सुरुवात केली आहे. लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी आम्ही संघटनात्मक मागे पडलो. तिथेही काही दिवसांत आम्ही काम करु.

लोकशाहीत जनता मोठी आहे. जनतेचा विश्वास सर्वात मोठा असतो. आमच्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करुन आम्ही जनतेसमोर जाऊ, असं मी म्हटलं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. आज देश बरबाद होतोय. त्याविरोधात काँग्रेस लढत आहे. जिल्हा परिषदेत भाजप आमच्यापेक्षा पुढे आहे. मात्र पंचायत समितीत आम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, असं पटोले म्हणाले.

पंचायत समिती पोटनिवडणूक (144 जागा)

भाजप – 33
शिवसेना – 22
राष्ट्रवादी काँग्रेस – 16
काँग्रेस – 35
इतर – 38

कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी निवडणूक?

अकोला – 28
धुळे – 30
नंदुरबार – 14
नागपूर – 31
पालघर – 14
वाशिम – 27

अकोला जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 04
शिवसेना – 05
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी काँग्रेस – 00
इतर – 19

धुळे जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 15
शिवसेना – 03
काँग्रेस – 03
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
इतर – 04

नंदूरबार जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 03
शिवसेना – 06
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी काँग्रेस – 04
इतर – 00

नागपूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 06
शिवसेना – 00
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 21
इतर – 02

पालघर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 03
शिवसेना – 05
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी काँग्रेस – 00
इतर – 04

वाशिम जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 02
शिवसेना – 03
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी काँग्रेस – 05
इतर – 09

 

Panchayat Samiti by-elections Congress has the highest number of seats