- Advertisement -

कर्जत – जामखेडमधील दबावाच्या राजकारणाविरोधात सुजय विखेंनी फुंकले रणशिंग

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या काही काळापासून कर्जत – जामखेडमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात नाही. अधिकारी व पोलिसांच्या माध्यमांतून दबाव टाकून आवाज दाबला जात आहे. या विरोधात आता लढाई सुरू झाली आहे असा जोरदार हल्लाबोल खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात चढवला.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी कर्जत शहरात करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार सुजय विखे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना विखे म्हणाले की, सध्या कोरोना काळात अनेक जण अडचणीत आहेत. अश्या काळात घराघरात मनोरंजन व्हावं याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक व खासदार संजय राऊत या दोघांना नेमले आहे. मलिक व राऊत हे दोघे उठसूठ बडबडतात अशी खोचक टिका केली.

पुढे विखे म्हणाले, यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. पण अहमदनगर जिल्हा व कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा असे अवाहन विखे यांनी केले.

दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्यानंतर कर्जत शहरात पावसाने हजेरी लावली. भर पावसात झालेल्या सभेत खासदार विखे यांनी महाविकास आघाडी सरकार व आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही विखे यांनी स्पष्ट केले.

 

भाषणाच्या शेवटी बोलताना विखे म्हणाले की, आज पावसामध्ये माझाही नंबर लागून गेला, या सभेच्या माध्यमांतून गोदड महाराजांचा आशिर्वाद मिळाला आहे त्यामुळे अगामी काळात सुखद घटना घडणार आहेत असे सुतोवाच केले. दरम्यान पावसाच्या सभेत नंबर लागला हे सांगून त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेसंबंधी खोचक वक्तव्य केले.

प्रास्ताविक करताना सचिन पोटरे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता टीका केली. केंद्र सरकारचे काम असले तरी येथील लोकप्रतिनिधी आपला ब्रँड वापरून त्याची प्रसिद्धी करतात. केवळ सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात ते धन्यता मानत आहे अशी टिका पोटरे यांनी केली.

कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.भरपावसात कर्जतमध्ये भाजप नेत्यांची राजकीय बॅटिंग सुरू आहे.

First Publisher : jamkhedtimes.com

Web Title: Sujay Vikhe blows the trumpet against the politics of pressure in Karjat Jamkhed

वेब शिर्षक: कर्जत – जामखेडमधील दबावाच्या राजकारणाविरोधात सुजय विखेंनी फुंकले रणशिंग

कर्जत – जामखेड रिपोर्टर  : सत्तार शेख, डॉ अफरोज पठाण