..म्हणून दोन बिबट्यांची नागपूर अधिवेशनात विकेट घेतली, मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना वेठीस धरणारांची गय केली जाणार नाही, आमदार राम शिंदे यांचा अधिकाऱ्यांंना गंभीर इशारा 

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । गेली अडीच वर्षे मी थांबलो, पण पुन्हा आलोय, लोक म्हणत्येत मागच्या दाराने आलोय, पण काम कसा दाखवतोय, त्रास द्यायचा मनामध्ये हेतू नसतो पण दोन बिबट्यांची विकेट घेतली आपण आता हिवाळी अधिवेशनात, सारखा धुमाकूळ घालत होते, लोकांची कामं करत नव्हते, अनियमितता होती, भ्रष्टाचार केला, संगनमत केलं त्यामुळं दोन जोडी आऊट झाली, यापुढे मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला वेठीस धरणारांची गय केली जाणार नाही, असा गंभीर इशारा आमदार राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील अधिकाऱ्यांना दिला आहे.

so two leopards took wickets in Nagpur winter session, in the constituency Those who trouble farmers and common people will punished MLA Ram Shinde gave a serious warning to the authorities

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जामखेड तालुक्यातील शिऊर, नायगाव, नाहुली, देवदैठण, तेलंगशी, धामणगाव, मोहरी, दिघोळ या भागातील भाजपा कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आमदार शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. संपुर्ण परिसरातील गावांमध्ये आमदार राम शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह सामान्य जनता एकवटल्याचे चित्र दिवसभर दिसले. एकुणच आजचा संपुर्ण दिवस आमदार राम शिंदे यांच्या झंझावाती दौर्‍याने गाजला.

so two leopards took wickets in Nagpur winter session, in the constituency Those who trouble farmers and common people will punished MLA Ram Shinde gave a serious warning to the authorities

पहिल्यांदाच असं झालयं की, वाढदिवसाचा सप्ताह बसलाय, सात दिवस वाढदिवस साजरा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. उत्स्फूर्त मतदार संघातील जनतेचे प्रेम, आपुलकी, ऋण या माध्यमांतून पहायला मिळत आहे, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

मी मंत्री असताना मतदारसंघात जो विकासाचा झपाटा सुरु होता, तो खंडीत झाल्याचे जनतेच्या चेहर्‍यावरून दिसत आहे. परंतु आता मी आमदार झालोय आणि आपलं सरकार पण आलेलं आहे. त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही.गेल्या अडीच तीन वर्षांत लाईट बी जात व्हती, डिप्या मिळत नव्हत्या, पण आता, तशी परिस्थिती राहिलेली नाही, कारण आपलं सरकार आलेलं आहे. आपला माणूस आमदार झालाय,कोणाचीही लाईट कट करू नये असा निर्णय सुध्दा आपल्या सरकारने घेतलाय,आपलं सरकार बळीराजाचं हित पाहणारं सरकार आहे. लोकांना त्रास होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे, असे आमदार राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

माझं एकवेळेस ऐकलं नाही तरी चालेल पण…

डीपी जळाली की आणून बसवायची हे जसं फडणवीस सरकारच्या काळात जसं होतं तसचं आता सध्याच्या सरकारने निर्णय घेतलाय, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे या भूमिकेतून शिंदे-फडणवीस सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. असे सांगत आमदार राम शिंदे म्हणाले की, मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला वेठीस धरणाराची गय केली जाणार नाही, मतदारसंघातील प्रत्येक माणूस कुठल्याही शासकीय कार्यालयात गेला तरी त्याचं काम झालं पाहिजे, माझं एकवेळेस ऐकलं नाही तरी चालेल पण सर्वसामान्य माणसाचं ऐकलं पाहिजे, हीच भूमिका आपल्याला मतदारसंघात घ्यावी लागेल, असे यावेळी शिंदे म्हणाले.

दहा वर्षे मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करताना कोणालाही कसलाही त्रास न देता मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला, त्यामाध्यमांतून कर्जत-जामखेडचं नाव महाराष्ट्रात रोषण केलं. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, मदतीने, सहकार्याने मला राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. हे केवळ जनतेच्या आशिर्वादामुळे शक्य झालं, जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वातून प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी सदैव आपले स्नेह आणि आशिर्वाद कायम ठेवावेत असे अवाहन आमदार राम शिंदे यांनी मतदारसंघातील जनतेला केले.