हायलाईट्स:
● अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप फायनल
● भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया
● ऑस्ट्रेलियाकडून भारताला 254 धावांचे लक्ष्य
● भारताच्या 15 षटकात 53 धावा
India vs Australia – ICC Under-19 Cricket World Cup Final Result : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप क्रिकेट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल मुकाबला होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 253 धावा केल्या. भारताला विजयासाठीच्या 254 धावांचा पाठलाग करताना 2 विकेट गमावल्या आहेत.
आज दक्षिण आफ्रिकेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाचा डाव 253 धावांवर रोखला. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंग याने अर्धशतकी खेळी केली. त्याने सर्वाधिक 55 धावा केल्या.
भारताकडून राज लिंबानी हा गोलंदाज सर्वात यशस्वी ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या, त्याला नमन तिवारीने चांगली साथ दिली. तिवारीने दोन विकेट पटकावल्या. पांडे आणि खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
254 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दोन विकेट गमावल्या आहेत. पहिल्या 15 षटकांत 2 विकेट गमावून भारताने अवघ्या 53 धावा केल्या आहेत. भारताकडून आर्शिन कुलकर्णी हा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. मुशीर खान हा चांगला फाॅर्मात आहे असे वाटत असतानाच तो 22 धावांवर बाद झाला. सध्या मैदानावर भारतीय कर्णधार उदय सहारन आणि आदर्श सिंग हे दोघे खेळत आहेत.