जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सोशल मीडिया जगतात इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲपने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रायव्हसी फिचर आणले आहे. कंपनीने सोमवारपासून युजर्सना युनिक युजरनेम राखीव करण्याची सुविधा अधिकृतपणे सुरू केली आहे. आगामी काही महिन्यांत हे फिचर पूर्णपणे रोलआउट केले जाईल. या नवीन अपडेटनंतर युजर्सना कोणाशीही चॅटिंग करण्यासाठी आपला वैयक्तिक मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही. केवळ एका युनिक हँडलवरून लोकांना शोधणे आणि त्यांच्याशी सुरक्षित संवाद साधणे शक्य होणार आहे.

आतापर्यंत व्हॉट्सॲपवर कोणाशीही संपर्क साधण्यासाठी फोन नंबर शेअर करणे अनिवार्य होते. यामुळे अनेक युजर्सना, विशेषतः महिलांना त्यांच्या ऑनलाईन प्रायव्हसीची काळजी असायची. या समस्येवर तोडगा म्हणून मेटा कंपनीने हे नवीन फिचर सादर केले आहे. नवीन अपडेटनुसार आता युजर्स आपले स्वतःचे युजरनेम तयार करू शकतील. हे फिचर इन्स्टाग्राम किंवा ट्विटरसारखेच काम करेल, ज्यामुळे वैयक्तिक नंबर पूर्णपणे सुरक्षित राहील.
व्हॉट्सॲप युजरनेम फिचर कसे काम करणार
हे एक पर्यायी आयडेंटिटी लेयर म्हणून काम करेल. युजर्स आपल्या आवडीनुसार एक युनिक हँडल तयार करू शकतील आणि नवीन व्यक्तीशी संवाद साधताना फोन नंबरऐवजी ते शेअर करू शकतील. या फिचरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सॲपवर युजरनेम शोधण्यासाठी कोणतीही पब्लिक डिरेक्टरी किंवा ऑटोकम्प्लीट सजेशन्स नसतील. याचा अर्थ असा की, जर एखाद्याला तुमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधायचा असेल, तर त्याला तुमचे अचूक युजरनेम माहिती असणे आवश्यक आहे. केवळ अंदाज लावून कोणीही तुम्हाला शोधू शकणार नाही. याशिवाय अधिक सुरक्षिततेसाठी एक पर्यायी युजरनेम की सेट करण्याचा पर्यायही मिळणार आहे, जी माहिती असल्याशिवाय समोरचा व्यक्ती तुमच्याशी चॅट करू शकणार नाही.

Whatsaap युजरनेम तयार करण्याचे नियम आणि अटी
व्हॉट्सॲपवर नवीन युजरनेम सेट करताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. तुमचे युजरनेम ३ ते ३५ कॅरेक्टर्सच्या दरम्यान असावे लागेल, ज्यामध्ये किमान एक अक्षर असणे अनिवार्य आहे. यामध्ये केवळ लोअरकेस म्हणजेच इंग्रजी लहान अक्षरे, आकडे, पूर्णविराम आणि अंडरस्कोअरचा वापर करता येईल. सुरवातीला डब्लू डब्लू डब्लू किंवा शेवटी डॉट कॉम, डॉट नेट सारख्या डोमेनचा वापर करता येणार नाही. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे हे युजरनेम इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही मेटा प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जागतिक लाँचिंग आणि भारताची स्थिती
जागतिक स्तरावर हे फिचर वेगवेगळ्या टप्प्यांत लाँच केले जात आहे. पहिल्या टप्प्यात अल्जेरिया, अझरबैजान, घाना, लिबिया आणि नेपाळमध्ये ७ जुलै २०२६ रोजी हे फिचर अधिकृतपणे लाँच होईल. यानंतर दुसरा टप्पा २० जुलै रोजी सुरू केला जाईल. तर सप्टेंबर २०२६ पर्यंत हे फिचर जगभरातील सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल. भारतामध्ये हे फिचर कधीपासून वापरता येईल याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु भारतीय युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन म्हणजेच नाव राखीव करण्याची प्रक्रिया मात्र आत्तापासूनच सुरू झाली आहे.
व्हॉट्सॲप युजरनेम कसे सेट करावे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस
तुमच्या आवडीचे युनिक नाव किंवा ब्रँडचे नाव सुरक्षित करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही युजरनेम क्रिएट करू शकता.
- सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ॲप ओपन करा.
- स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. जर तुम्ही आयफोन वापरत असाल, तर खाली दिलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा.
- यानंतर मेनूमध्ये दिलेल्या सेटिंग्ज या पर्यायावर क्लिक करा.
- सेटिंग्ज पेज ओपन झाल्यानंतर तिथे वरच्या बाजूला तुमचे नाव आणि प्रोफाईल फोटो दिसेल, त्या प्रोफाईल पर्यायावर क्लिक करा.
- प्रोफाईल सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नाव आणि अबाऊट च्या सोबतच एक नवीन युजरनेम चा पर्याय दिलेला दिसेल.
- युजरनेम समोरील पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला हवे असलेले युनिक नाव टाईप करा. हे नाव लहान अक्षरे, आकडे किंवा अंडरस्कोअर वापरून तयार करा.
- तुम्ही टाकलेले नाव उपलब्ध असेल तर खाली ग्रीन टिक दिसेल. त्यानंतर सेव्ह किंवा डन बटनावर क्लिक करा.
फोन नंबर पूर्णपणे बंद होणार का?
अनेक युजर्सच्या मनात शंका आहे की युजरनेम आल्यानंतर फोन नंबरची गरज संपणार का, तर याचे उत्तर नाही असे आहे. व्हॉट्सॲप लॉगइन करण्यासाठी आणि अकाऊंट सुरू ठेवण्यासाठी फोन नंबर आधीसारखाच आवश्यक राहील. जे तुमचे जुने चॅट्स आहेत किंवा जुने संपर्क आहेत, तिथे फोन नंबर दिसेल. युजरनेम स्वीकारणे हा एक पर्यायी मार्ग असेल, जो फोन नंबरसोबत किंवा त्याऐवजी वापरता येऊ शकेल.
जर तुम्हाला तुमचे आवडते नाव किंवा ब्रँडचे नाव सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही आत्ताच व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचे नाव राखीव करू शकता. उशीर केल्यास तुमच्या आवडीचे युजरनेम इतर कोणीतरी आधीच बुक करण्याची शक्यता आहे.
Q:: व्हॉट्सॲप युजरनेमचा उपयोग काय?
A: व्हॉट्सॲप युजरनेमचे तीन मुख्य फायदे आहेत. पहिला म्हणजे प्रायव्हसी — नवीन व्यक्तीशी बोलताना आपला वैयक्तिक फोन नंबर द्यावा लागणार नाही. दुसरा म्हणजे सुरक्षितता — अनोळखी व्यक्तीला फक्त अचूक युजरनेम माहित असल्यासच संपर्क करता येईल. तिसरा म्हणजे ओळख — व्यवसाय, क्रिएटर्स आणि संस्थांना त्यांच्या ब्रँडच्या नावाने ओळखले जाता येईल.
Q: व्हॉट्सॲप युजरनेम भारतात कधी येणार?
A: सप्टेंबर २०२६ पर्यंत जगभरात उपलब्ध होणार आहे. भारतासाठी अधिकृत तारीख अद्याप जाहीर नाही, मात्र युजरनेम राखीव करण्याची सुविधा आत्तापासूनच सुरू आहे.
Q: व्हॉट्सॲप युजरनेम कसे तयार करावे?
A: व्हॉट्सॲप उघडा, Settings > Account > Username मध्ये जा आणि तुमचे आवडते युनिक नाव टाका. ग्रीन टिक दिसल्यास Save करा.
Q: व्हॉट्सॲप युजरनेम मोफत आहे का?
A: होय, हे फिचर पूर्णपणे मोफत असून सर्व युजर्सना उपलब्ध असेल.
Q: युजरनेम आल्यानंतर फोन नंबर बंद होणार का?
A: नाही. फोन नंबर अकाऊंटसाठी आवश्यकच राहील. युजरनेम हा एक पर्यायी मार्ग असेल.
Q: व्हॉट्सॲप युजरनेममध्ये कोणते कॅरेक्टर वापरता येतात?
A: फक्त लोअरकेस अक्षरे, आकडे, पूर्णविराम आणि अंडरस्कोअर वापरता येतात. युजरनेम ३ ते ३५ कॅरेक्टर्सचे असावे.
Q: एकच युजरनेम दोन जणांना मिळू शकतो का?
A: नाही. व्हॉट्सॲप युजरनेम पूर्णपणे युनिक असतो. एकदा एखाद्या व्यक्तीने एखादे युजरनेम घेतले की ते दुसऱ्या कोणालाही मिळत नाही. शिवाय हे युजरनेम Instagram आणि Facebook वरही एकाच वेळी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
Q: व्हॉट्सॲप युजरनेम नंतर बदलता येतो का?
A: होय. युजरनेम कधीही बदलता येतो. Settings > Account > Username मध्ये जाऊन नवीन युजरनेम सेट करता येतो. मात्र जुने युजरनेम सोडल्यानंतर ते इतर कोणालाही मिळू शकते, त्यामुळे बदल करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
Q: WhatsApp युजरनेम Instagram वर वापरता येतो का?
A: थेट वापरता येत नाही, मात्र तुमचे Instagram किंवा Facebook चे युजरनेम WhatsApp वर Claim करण्याचा पर्याय Meta ने दिला आहे. म्हणजेच तुमचे Instagram वरील @नाव WhatsApp वरही घेता येऊ शकते, जर ते अद्याप कोणी बुक केले नसेल तर.