आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना मोठे यश, जामखेड पंचायत समिती कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न मार्गी, उद्या होणार भूमिपूजन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून उद्या 16 मे रोजी आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते निवासस्थान कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. या कामासाठी 10 कोटी 91 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. (With the efforts of MLA Rohit Pawar, the issue of jamkhed Panchayat Samiti staff accommodation has been resolved, Bhumi Pujan will be held tomorrow)

With the efforts of MLA Rohit Pawar, the issue of jamkhed Panchayat Samiti staff accommodation has been resolved, Bhumi Pujan will be held tomorrow!
जाहिरात

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना हक्काचे शासकीय निवासस्थाने असावीत यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासनदरबारी केलेल्या जोरदार पाठपुराव्याला मोठे यश येत असल्याचे दिसत आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी 10 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जामखेड पंचायत समिती कार्यालयाच्या लगत असलेल्या जागेत या निवासस्थानाचे काम होणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ उद्या 16 मे रोजी सकाळी 9 वाजता आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.