श्रीगोंदा : शेतकऱ्याकडून दीड हजार रूपयांची लाच स्वीकारणारा कुकडी कार्यालयातील कारकून एसीबीच्या जाळ्यात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाणी उपसा करण्याची परवानगी दिल्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून दीड हजार रूपयांची लाच स्वीकारताना कुकडी पाटबंधारे विभागाच्या श्रीगोंदा कार्यालयातील दप्तर कारकूनास रंगेहाथ पकडण्याची धडक कारवाई अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पार पाडली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे बोरी (ता.श्रीगोंदा) येथे शेत जमिनीचे क्षेत्र आहे.त्यातील एक हेक्टर क्षेत्रासाठी धनगरवाडी जलाशय येथून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२,श्रीगोंदा यांच्याकडे अर्ज केला होता.सदर परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात या कार्यालयातील दप्तर कारकून सुभाष यादवराव वाबळे (वय 56 वर्ष) याने तक्रारदाराकडे 2 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबबत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

12 ऑगस्ट 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर पथकाने सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणी वेळी यातील दप्तर कारकून सुभाष वाबळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 2 हजार रूपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती दीड हजार रूपयांची लाच रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने वाबळे यांना रंगेहाथ पकडण्याची कारवाई केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सुभाष वाबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrigonda, Kukdi Irrigation Division office clerk Subhash Yadavrao Wable bribe of 1500 rupees was accepted from farmer, Ahmednagar ACB  Trap Today

ही कारवाई डिवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर.बी. आल्हाट यांच्या टीमने केली. या पथकात पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, महिला पोलीस नाईक राधा खेमनर,पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड यांचा समावेश होता.

यशस्वी सापळा अहवाल

युनिट -अहमदनगर

तक्रारदार- पुरुष वय- ३४ वर्ष,रा. हंगेवाडी,तालुका श्रीगोंदा  जि.अहमदनगर

आरोपी – आलोसे सुभाष यादवराव वाबळे, वय 56 वर्ष धंदा नोकरी, दप्तर कारकून, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २, श्रीगोंदा जि. अहमदनगर रा. जकाते वस्ती, स्टेशन रोड,श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर

लाचेची मागणी- २०००/-₹

लाच स्वीकारली -१५००/-₹

लाचेची मागणी दिनांक- ता.१२/०८/२०२३

▶️ लाचेचे कारण – तक्रारदार यांचे वडिलाचे नावे मौजे बोरी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर येथे शेत जमिनीचे क्षेत्र आहे.त्यातील  एक हेक्टर क्षेत्रासाठी धनगरवाडी जलाशय येथून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२,श्रीगोंदा यांच्याकडे केला होता. सदर परवानगी प्राप्त करून दिल्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे २०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक १२/०८/२०२३ रोजी  पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान यातील आलोसे वाबळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १५००/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे वाबळे यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

सापळा अधिकारी :- आर.बी. आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

पर्यवेक्षण अधिकारी – प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

सापळा पथक –  पोना रमेश चौधरी, विजय गंगुल, मपोना राधा खेमनर,पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे, चापोहेकॉ दशरथ लाड.

मार्गदर्शक – मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मा.श्री. माधव रेड्डी सो. अपर पोलीस अधीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र,नाशिक.

श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला. प्र.वि. नाशिक

आरोपीचे सक्षम अधिकारी – मा. अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ,पुणे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४