धक्कादायक: हात पाय बांधून मजुरांना अमानुष मारहाण, सोलापुरातील घटनेनं महाराष्ट्र हादरला

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे घेण्यासाठी बोलवून मजुरांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून समोर आली आहे.या घटनेचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये मजुरांना बेदम मारहाण केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे.

Shocking,Inhuman beating of laborers by tying their hands and feet, the incident in Solapur shook Maharashtra,Laborers brutally beaten in Bhutashte village of Madha taluka

सोलापुरात दोन मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी येण्याचा निरोप पाठवला. आपल्याला कामाचे पैसे मिळणार याचा आनंद या मजुरांच्या चेहऱ्यावर होता. मात्र हा आनंद काही क्षणात नाहीसा झाला. घरी आलेल्या मजुरांना जबरदस्तीने बसवण्यात आलं.या दोघांचे हात पाय बांधण्यात आले. त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. या मजुरांना अमानुष मारहाण करण्यात आली.ही धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भुताष्टे गावात घडली आहे.

पांढऱ्या दोरीने पाठीवर तसेच हाताने अमानुष मारहाण केल्याच व्हिडीओमध्ये समोर आलं. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत त्यांनी शिवीगाळ दमदाटी केलीमजूर विकास नाईकवाडे आणि कसबे या दोघांना त्यांनी गायब केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी माढा पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात अॅट्रासिटी,मारहाण, आणि अपहारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुताष्टे गावातील लाईट पोलचे मुकादम बालाजी मोरे यांच्याकडे विकास नाईकवाडे आणि कसबे हे दोघे मजुर मागील दोन महिन्यांपासून कामाला होते. कामाचे पैसे घ्यायला ये असं सांगून या दोघांना आरोपी बालाजी मोरे, भालचंद्र आनंत यादव यांच्यासोबत आणखी चार जणांना मारहाण केली. माढा पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे.