Swarajya Sankalp Pledge | रोहित पवारांनी महाराष्ट्रासमोर मांडला स्वराज्य संकल्प

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) Swarajya Sankalp Pledge | आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक खर्ड्यातील शिवपट्ट्ण किल्ल्यावरील (Shivpattana fort) मैदानात आज भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज (swarajya dhwaj) उभारण्यात आला.भगवा हा एकतेचा व समतेचा प्रतिक आहे हे ठासून सांगत रोहित पवार यांनी विचारांचं नवं सोनं महाराष्ट्राला दिले. राज्यातील तरूणाईला साद घालत असताना स्वराज्य संकल्पाचा निर्धार यावेळी त्यांनी केला. (Rohit Pawar presented Swarajya Sankalp to Maharashtra through Swarajya Sankalp Pledge)

राज्यात दरवर्षी अनेक दसरा (Dussehra) मेळावे होतात. त्यातून राजकीय विचारांची देवाणघेवाण होत असते. मात्र भगव्या स्वराज्य ध्वजाचा  उभारणी सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर ऐतिहासिक खर्डा शहरात (Kharda city) पार पडला या सोहळ्यातून रोहित पवार यांनी महाराष्ट्र आणि देश उभारणीसाठी पुरोगामी विचारांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित केले आहे. त्यांनी उपस्थित जनसमुदायाला स्वराज्य संकल्प प्रतिज्ञा देत नवा महाराष्ट्र घडवण्याचे मनसुबे यातून दाखवून दिले.

 

खर्डा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात रोहित पवार यांनी महाराष्ट्राला साद घालत स्वराज्य संकल्प प्रतिज्ञा दिली आहे.

काय आहे स्वराज्य संकल्प प्रतिज्ञा Swarajya Sankalp Pledge ?

Swarajya Sankalp Pledge

मी प्रतिज्ञा करतो की, या महाराष्ट्रात मी कुठल्याही स्त्रीवर अन्याय करणार नाही आणि कुठलाही अन्याय होऊ देणार नाही

मी प्रतिज्ञा करितो की, स्वता:चे शिक्षण मेहनतीने पुर्ण करेन व आपल्या आसपास कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन

मी प्रतिज्ञा करितो की, कोणत्याही अंधश्रध्देला बळी न पडता माझ्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करेल, या महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जाईन.

मी प्रतिज्ञा करितो की, आपल्या आई वडीलांचा, जेष्ठांचा, आपल्या संस्कृती व इतिहासाचा तसेच समाजाला उपयोगी पडणाऱ्या सर्व घटकांचा योग्य तो सन्मान करेन.

मी प्रतिज्ञा करितो की, जाती धर्म, शहरी ग्रामीण, व कोणत्याही आर्थिक परिस्थितीवर तश्या कोणत्याही आधारावर माणसा माणसांत भेदभाव करणार नाही. तसं होऊनही देणार नाही.