प्रसिध्द वृत्तनिवेदिका प्रियांका शेळके – धारवाले सन्मान स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर शहरातील सावेडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सन्मान स्त्री शक्तीचा २०२२ हा  पुरस्कार प्रसिध्द वृत्तनिवेदिका प्रियांका शेळके – धारवाले यांना नुकताच प्रदान करण्यात आला. (Renowned news reporter Priyanka Shelke – Dharwale honored with Stree Shakti Award)

सावेडी येथील साई – संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा प्रसिद्ध वृत्त निवेदिका प्रियंका शेकळे- धारवाले यांना सन्मान स्त्री शक्तीचा या पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार तोफखाना पोलीस स्टेशनच्या ज्योती गडकरी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी सीमा त्र्यबंके, प्रतिष्ठानचे संस्थापक व नगरसेवक सुनील त्र्यबंके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, अध्यक्ष योगेश पिंपळे यांच्यासह मोठ्या संख्नेने मान्यवर व नगरकर उपस्थित होते.

प्रियंका धारवाले यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यापूर्वी त्यांना राज्यस्तरीय चौथा स्तंभ हा पुरस्कार मिळालेला आहे.