Online quiz Savitri-Fatema Vichar Manch | सावित्री-फातेमा विचार मंचच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा : विजेत्यांना मिळणार 2 लाख 25 हजारांची बक्षिसे !
Online quiz Savitri-Fatema Vichar Manch | अहमदनगर : पैगंबर जयंती (Prophet’s birthday) निमित्त ‘सावित्री फातेमा विचारमंच अहमदनगर’ तर्फे साने गुरुजी (Sane Guruji) लिखित ‘इस्लामी संस्कृती’ (Islamic culture) या पुस्तकावर आधारित ऑनलाइन स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 3 गटांमध्ये घेतली जाणार आहे. ही स्पर्धा अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासाठी आहे.
तीन गटामध्ये होणारी ही ऑनलाईन स्पर्धेत गट नं 1, दहावी ते बारावी, गट नं.2 पदवीधर, पदव्युत्तर आणि पी.एच.डी. गट नं. 3 – खुला गट अशी असणार आहे. प्रत्येक गटांमध्ये अनुक्रमे पहिले बक्षिस रु. 31000/-, दूसरे रु. 21000/-, तिसरे रु. 11000/- अशी तीन बक्षिसे दिली जातील. या व्यतिारिक्त प्रत्येक गटात प्रत्येकी रु. 1100/- अशी अकरा बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल. नावनोंदणी शुल्क प्रत्येकी रु. 50/- असेल. नावनोंदणी ऑनलाइन केली जाईल. नाव नोंदणीची अंतीम तारीख 30/10/2021 आहे. परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवली जाईल.(Online quiz on behalf of Savitri-Fatema Vichar Manch: Winners will get 2 lakh 25 thousand prizes)
नावनोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला साने गुरूजींचे लिखित ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक मोफत दिले जाईल. 21/11/2021 रोजी 100 मार्काची परीक्षा घेतली जाईल.परिक्षेनंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल.
उपरोक्त स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन समाजात सदभावना वृद्धिंगत करण्याचा कार्यात सहभागी व्हावे, नांव नोंदणी करण्यासाठी – https://rzp.io/l/QFNA1KVJh या लिंक चा वापर करावे.असे आवाहन मंचच्यावतीने डॉ. सर्जेराव निमसे, ॲड संभाज़ी बोरुडे, ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, कॉ. बहिरनाथ वाकळे, डॉ. सय्यद रफिक, हाजी शौकतभाई तांबोली, मौलाना इर्शाद मखदूमी, आबेद दुलेखान यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सय्यद आमिर – 9226701819, शेख उमेर- 9260505000, शेख मुनज़्ज़र – 9422212332 यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.